मधुकर कुकडे यांची जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 22:29 IST2018-06-15T22:29:50+5:302018-06-15T22:29:50+5:30
भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे खासदार मधुकर कुकडे यांनी भंडारा जिल्हाधिकारी यांच्याशी विविध विषयावर चर्चा केली.

मधुकर कुकडे यांची जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे खासदार मधुकर कुकडे यांनी भंडारा जिल्हाधिकारी यांच्याशी विविध विषयावर चर्चा केली.
भंडारा शहरातील जीवनदायी वैनगंगा नदीमध्ये असलेले इर्केनिया वनस्पती काढण्याबाबद सकारात्मक चर्चा करण्यात आली, शेतकऱ्यांसाठी रात्रीचे भारनियमन बंद करण्याबाबद चर्चा करण्यात आली. तसेच शेतकºयांना तुडतुडा रोगाची नुकसान भरपाई शेतकºयांचे खात्यामध्ये जमा होणे सुरू झाले, अशा शेतकºयांचे खात्यामधून बँकांनी पिककर्जाचे पैसे वसूल करण्यात येवू नये अशा सूचना बँकांना देण्याबाबद सकारात्मक चर्चा करण्यात आली. जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा, महिला रुग्णालयाचे बांधकाम, वाहतूक पोलिसांची सामान्य नागरिकांसोबत अरेरावी इतर महत्वाचे विषयांवर जिल्हाधिकारी शांतनु गोयल यांचेशी चर्चा करण्यात आली. त्यावेळी प्रदेश सरचिटणीस धनंजय दलाल, डॉ. रविंद्र खानखेडे, डॉ. जगदीश निंबार्ते, विजय खेडीकर, बाळा गभणे, नरेंद्र झंझाड, आनंद बोदेले, सचिन बडवाईक उपस्थित होते.