माडगी पर्यटनस्थळ घोषित; विकास थंडबस्त्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 21:37 IST2018-07-27T21:36:18+5:302018-07-27T21:37:12+5:30
विदर्भाची मिनी पंढरी म्हणून प्रसिध्द माडगी (देव्हाडी) हे धार्मिक व पर्यटन स्थळ असून राज्य शासनाने पर्यटनस्थळाची घोषणा एक ते दीड वर्षापूर्वी केली, पंरतु येथील विकासकामे मात्र रखडली आहेत. १ कोटी ९० लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. केवळ ६० लाखांची कामे झाली आहेत. उर्वरित कामे कधी होाार असा प्रश्न पडला आहे.

माडगी पर्यटनस्थळ घोषित; विकास थंडबस्त्यात
ठळक मुद्देकामे कासवगतीने : ६० लाख खर्च , १ कोटी ३० लाख रुपयांची प्रतीक्षा
<p>लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : विदर्भाची मिनी पंढरी म्हणून प्रसिध्द माडगी (देव्हाडी) हे धार्मिक व पर्यटन स्थळ असून राज्य शासनाने पर्यटनस्थळाची घोषणा एक ते दीड वर्षापूर्वी केली, पंरतु येथील विकासकामे मात्र रखडली आहेत. १ कोटी ९० लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. केवळ ६० लाखांची कामे झाली आहेत. उर्वरित कामे कधी होाार असा प्रश्न पडला आहे.
तुमसर-गोंदिया राज्यमार्ग व मुंबई-हावडा रेल्वे मार्गावर वैनगंगा नदीपात्रात नृसिंह -विरसिंग यांचे मोठे मंदिर असून अण्णाजी महाराजांच्या सानिध्याने हे स्थळ पवित्र झाले आहे. २०० फुट शिळेवर हे मंदिर असून नयनरम्य स्थळ म्हणून राज्य शासनाने पर्यटन स्थळ घोषित केले. दरवर्षी येथे लाखो भाविकांची यात्रा भरते. विदर्भाची मिनी पंढरी म्हणून हे क्षेत्र महाराष्ट्र व मध्यप्रदेशात प्रसिध्द आहे. पर्यटन स्थळ घोषनेनंतर सुमारे ६० लाखांचा निधी येथे खर्च करण्यात आला.
यात मंदिरापर्यंत जाण्याकरिता रस्ता तयार करणे, मंदिराला सरंक्षण भिंत व इतर कामे करण्यात आली. सिमेंटीकरण, भक्त निवास, सभागृह, स्वयंपाक गृह, शौचालये इत्यादींची कामे अजूनपर्यंत झाली नाहीत. सुमारे १५ कामांचा यात समावेश आहे.
मागील अनेक वर्षापासून पर्यटनस्थळाची प्रतिक्षा होती. ती घोषीत झाली. परंतु पर्यटनस्थळी कामे पूर्ण करण्याची गरज आहे. निधी देऊन रखडलेली कामे येथे शासनाने त्वरित करावी. परिसरातील बेरोजगारांना रोजगार प्राप्त होण्यास मदत होईल.
- इंजि. विपील कुंभारे
युवा काँग्रेस नेते,माडगी (दे.)