भंडारा-गोंदिया जिल्ह्यात होणार ‘मचाण पर्यटन’!
By Admin | Updated: August 1, 2016 00:20 IST2016-08-01T00:20:18+5:302016-08-01T00:20:18+5:30
भंडारा वनवृत्त क्षेत्रांतर्गत मोठ्या प्रमाणात वृक्षांची अवैध कटाई व प्राण्यांची शिकार सुरू असल्याची तक्रार ग्रीन हेरिटेज संस्थेने वनमंत्री मुनगंटीवार यांना केली.

भंडारा-गोंदिया जिल्ह्यात होणार ‘मचाण पर्यटन’!
प्रधान मुख्य वनसंरक्षकांना पत्र : ग्रीन हेरिटेज संस्थेच्या पत्राची वनमंत्र्यांनी घेतली दखल
भंडारा : भंडारा वनवृत्त क्षेत्रांतर्गत मोठ्या प्रमाणात वृक्षांची अवैध कटाई व प्राण्यांची शिकार सुरू असल्याची तक्रार ग्रीन हेरिटेज संस्थेने वनमंत्री मुनगंटीवार यांना केली. संस्थेच्या पत्राची दखल वनमंत्र्यांनी घेवून चौकशीचे आदेश दिले आहे. सोबतच यावर आळा बसावा यासाठी ‘मचाण पर्यटन’ कार्यवाहीसाठी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांना पुढील कार्यवाहीसाठी निर्देश दिले आहे.
भंडारा येथील ग्रीन हेरिटेज ही संस्था पर्यावरणासंबंधी काम करीत आहे. मागील काही दिवसात भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील जंगलात मोठ्या प्रमाणात वृक्षांची कटाई व वन्यप्राण्यांच्या शिकारी होत आहे. या गंभीर बाबीची तक्रार ग्रीन हेरिटेजच्या पदाधिकाऱ्यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना केली. संस्थेच्या पत्राची तातडीने त्यांनी दखल घेतली. संस्थेचे अध्यक्ष सईद शेख यांनी पाठविलेल्या तक्रारीची दखल घेत वनमंत्री मुनगंटीवार यांनी, वृक्षांची कटाई व वन्यप्राण्यांची शिकारीची दखल घेतली. याची चौकशी करून योग्य कार्यवाही करावी व अहवाल सादर करण्याच्या सूचना प्रधान मुख्य वनसंरक्षक यांना वनमंत्र्यांनी केल्या आहेत. (शहर प्रतिनिधी)
पर्यटकांमध्ये वाढ अपेक्षित
ग्रीन हेरिटेज या संस्थेने वनमंत्री मुनगंटीवार यांना शिकार व वृक्षतोडीवर आळा बसावा, यासाठी मचाण पर्यटन सुरू करण्याची मागणी केली. भंडारा व गोंदिया या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वनसंपदा आहे. येथे पर्यटकांमध्ये मोठी वाढ होवू शकते. त्यामुळे मचाण पर्यटन सुरू करावी, अशी मागणी केली होती. याची दखल घेत प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांना पुढील योग्य कार्यवाहीच्या सूचना दिल्या आहे.