शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
4
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
5
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
6
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
7
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
8
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
9
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
10
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
11
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
12
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
13
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
14
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
15
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
16
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
17
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
18
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
19
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
20
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच

पशुधनावर ‘लंपी स्कीन डिसिज’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 05:00 IST

नाकाच्या व तोंडाच्या आतील भागामध्ये गाठी आढळून येतात. ग्रंथीला सूज येणे पुढील व मागील पायावर सूज असणे व पोळीला सूज येणे अशीही लक्षणे प्रामुख्याने आढळतात. तसेच ताप येतो, डोळ्यातून तसेच नाकातून स्त्राव गळणे, भूक मंदावणे, योग्य उपचार झाल्यास यामध्ये मरतुकीचे प्रमाण अत्यंत नगण्य आहे.

ठळक मुद्देविषाणूजन्य साथीचा आजार : पशू व गोठ्यांची स्वच्छता ठेवण्याचे आवाहन

देवानंद नंदेश्वर।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात पशूधनावर ‘लंपी स्कीन डिसीज’ विषाणूजन्य साथीच्या आजाराचा प्रवेश झाला आहे. सदर आजारावर प्रतिबंधात्मक लस किंवा ठोस औषधोपचार उपलब्ध नाही. लहान वासरांमध्ये याची अधिक तीव्रता दिसून येते.लंपि स्किन डिसीज हा विषाणूजन्य साथीचा आजार आहे. या आजाराचा प्रसार एका बाधीत पशूधनापासून दुसऱ्या पशूधनाला डास, चावणाऱ्या माशा व गोचीड यांच्यामार्फत होतो. विशेषत: उष्ण व दमट हवामानात याचा प्रसार जास्त प्रमाणात होतो. याआजाराने बाधीत झालेल्या जनावरांना डोके, मान, पोट, पाठ, पाय तसेच शेपटी खाली त्वचेवर दोन ते पाच सेंटीमीटर व्यासाच्या गाठी येतात व काही दिवसांनी त्यामधून पस येऊ शकतो. नाकाच्या व तोंडाच्या आतील भागामध्ये गाठी आढळून येतात. ग्रंथीला सूज येणे पुढील व मागील पायावर सूज असणे व पोळीला सूज येणे अशीही लक्षणे प्रामुख्याने आढळतात. तसेच ताप येतो, डोळ्यातून तसेच नाकातून स्त्राव गळणे, भूक मंदावणे, योग्य उपचार झाल्यास यामध्ये मरतुकीचे प्रमाण अत्यंत नगण्य आहे. बाधित होणारे पशुधन आजार प्रामुख्याने सर्व वयोगटातील संकरीत व देशी गाय वर्ग, म्हैस वर्गातील पशुधनास होऊ शकतो. लहान वासरांमध्ये याची तीव्रता अधिक नसते. पशुधनास बाधा होण्याचे प्रमाण दहा ते वीस टक्के असून लागण झालेल्या जनावरांना मृत्यू होण्याचे प्रमाण एक ते पाच टक्के एवढे आहे.अशा प्रकारची लक्षणे आढळून आल्यास बाधित पशूधन तात्काळ इतर पशूधनापासून अलग करणे आवश्यक आहे. साथ भागातील पशूधनाची वाहतूक व विक्री थांबवणे आवश्यक आहे. रोगाचा प्रसार थांबविण्यासाठी रोगाचा प्रसार करणारे कीटाणू जसे डास, माशा व गोचीड यांचे निर्मूलनासाठी आवश्यक उपाययोजना करणे आवश्यक आहे. बाधित पशूधन व सामान्य पशूधन चराईसाठी एकत्र सोडू नये. हा आजार कीटकांपासून प्रसार होत असल्याने आपल्या गोठ्यातील कीटकांचा बंदोबस्त करावा लागेल. त्यासाठी जनावरांचा गोठा कोरडा आणि स्वच्छ ठेवावा लागेल. तसेच गोठ्याशेजारी पाणी, शेण, मुत्र जमा होवून चिखल होणार नाही याची काळजी घ्यावी. गोठ्यात असलेले कीटक मारण्यासाठी कीटनाशकांचा वापर करावा. सद्यस्थितीत यावर प्रतिबंधात्मक लस किंवा औषधोपचार उपलब्ध नाही. तथापि आजारी पशुधनाच्या लक्षणानुसार उपचार केल्यास दोन ते तीन आठवड्यामध्ये पशूधन पूर्णपणे बरे होऊ शकते. सदरचा आजार पशूधनापासून मानवास होत नाही. हा आजार शेळ्यामेंढ्या व मानवास होत नाही.प्रतिबंधात्मक उपाययोजनाप्रतिबंधक उपाय योजनेकरिता घरच्या घरी कीटकनाशक बनविण्यासाठी एक लीटर पाण्यात ४० मिली करंज तेल, ४० मिली निम तेल आणि १० ग्राम अंगाची साबण चांगली मिसळून घ्यावी. हे द्रावण ०,३ व ७ व्या दिवशी पशुधनावर फवारल्यास आपल्या गोठ्यामध्ये सर्व प्रकारच्या कीटकांचे निर्मूलन होते व रोगाचा प्रसार रोखण्यासाठी मदत होऊ शकते.

टॅग्स :Socialसामाजिक