लकी ड्रॉ, गेम शो उत्साहात

By Admin | Updated: April 21, 2016 00:38 IST2016-04-21T00:38:25+5:302016-04-21T00:38:25+5:30

लोकमत सखी मंचतर्फे जवाहरनगर येथील संगीता भुजाडे बेला येथील मनीषा इंगळे व समृद्धीनगर येथील दीपा टेंभुर्णे यांच्या राहत्या घरी ...

Lucky Draw, Game Show Enthusiast | लकी ड्रॉ, गेम शो उत्साहात

लकी ड्रॉ, गेम शो उत्साहात


भंडारा : लोकमत सखी मंचतर्फे जवाहरनगर येथील संगीता भुजाडे बेला येथील मनीषा इंगळे व समृद्धीनगर येथील दीपा टेंभुर्णे यांच्या राहत्या घरी लकी ड्रॉ व वन मिनिट गेम शोचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील सखी महिला व युवतींनी कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
विजेत्या स्पर्धकांना अतिथींच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमात विविध प्रकारचे मनोरंजनात्मक गेम्स् सखींना खेळविण्यात आले. त्यात ‘सिट अप वन लेग’ , एलिफंट रायनो, डांसिंग ग्रृप व बलुन ब्लास्ट त्यात जवाहरनगर येथील हेमा गजभिये, कुंदा नारनवरे व रश्मी कुमार यांनी बाजी पटकाविली तसेच गोल्ड प्लेटेड नथ करिता अर्चना गाडगे भाग्यवान विजेता ठरली.
सिल्वर कोटेड क्वाईन करिता कुंदा नारनवरे, पुनम मडावी, नम्रता बागडे, पुजा बन्सोड, उर्मिला चकोरे, साधना काटकर, सुरेखा हरडे व रोशनी बिसेन विजयी ठरल्या. बेला येथील ज्योती बांते, शालु जिभकाटे, रंजिता साठवणे व कोमल उईके तर ज्योती बांते गोल्ड प्लेटेड नथ करिता भाग्यवान ठरली.
सिल्वर कोटेड क्वाईन करिता पुष्पा चेटुले, शीतल भोंगाडे, मंजुषा लोंदासे, स्मिता रामटेके, स्रेहा ढोबळे यांनी प्राप्त केले.
समृद्धीनगर येथे हर्षदा निंबार्ते, कोमल बेहलपांडे, स्मिता बडवाईक व करिश्मा उगलमुगले यांनी बाजी मारली तर गोल्ड प्लेटेड नथ करिता सुरेखा लांडगे, भाग्यवान ठरली. सिल्वर कोटेड क्वाईनकरिता मंजु उजवणे, लता कटकवार, सत्यशिला मेश्राम, शिला फेंडर, अनिता हिवराळे, लता कोचे लकी ठरल्या.
कार्यक्रमाचे नियोजन व संचालन जिल्हा संयोजिका सीमा नंदनवार तर आभार विभाग प्रतिनिधी संगिता भुजाडे, मनिषा इंगळे व दिपा टेंभुर्णे यांनी मानले. सखी विभाग प्रतिनिधी स्रेहा वरकडे, मंदा पडोळे, सरला पशिने व संध्या रामटेके यांनी सहकार्य केले. (मंच प्रतिनिधी)

Web Title: Lucky Draw, Game Show Enthusiast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.