निष्ठावान कार्यकर्त्यांची काँग्रेस, राकाँकडे वाणवा
By Admin | Updated: October 19, 2014 23:16 IST2014-10-19T23:16:44+5:302014-10-19T23:16:44+5:30
एकेकाळी कॉग्रेस व त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यातील मतदार संघावर वर्चस्व असले तरी ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांचे नेटवर्क टिकवून ठेवण्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला फारसे

निष्ठावान कार्यकर्त्यांची काँग्रेस, राकाँकडे वाणवा
भंडारा : एकेकाळी कॉग्रेस व त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यातील मतदार संघावर वर्चस्व असले तरी ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांचे नेटवर्क टिकवून ठेवण्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला फारसे यश आले नसल्याचे दिसून येते. लोकसभा निवडणुकीतील कार्यकर्त्यांची ही उदासीनता बऱ्याच अंशी विधानसभेतही कारणीभूत ठरली. भाजप लाटेचा प्रभाव विधानसभेच्या निवडणुकीतही कायम राहिल्याचे जाणवले.
दोन्ही जिल्ह्यात जिल्हा परिषदेवर भाजपाचे वर्चस्व आहे. मागील निवडणुकीत सहापैकी चार आमदार भाजप-सेनेचे होते. आजच्या निकालानंतर शिवसेनेची माघार झाली. ग्रामीण भागावर भाजपाची पकड दिसली. भंडारा जिल्हयातील तिन्ही विधानसभा जागांवर भाजपने कब्जा केला. कॉग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना जो साध्य करता आले नाही, ते भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी करून दाखविले. मतांचे विभाजन आणि नावाची लाट या दोन प्रमुख कारणांमुळे भाजपने दणदणीत यश संपादन केले.
भाजपने प्रत्येक फळीतला कार्यकर्ता शेवटपर्यंत जपून ठेवला असेच म्हणावे लागेल. ही किमया कॉग्रेस व राष्ट्रवादी पक्षात करता आली नाही. खरा कार्यकर्ता कुठेतरी दुखावला, कुठेतरी हरवला असे दृश्य होते. मेहनत घेणाऱ्या कार्यकर्ते असले तरी या कार्यकर्त्यांच्या संख्या मात्र रोडावली. याचाच फटका या निवडणुकीत बसला. वरिष्ठ नेत्यांी पकड कुठेतरी सैल झाली, असे वाटले. व्यक्तिमत्वामुळे जिल्ह्याच्या राजकारणावर त्यांचा प्रभाव दिसून येणाऱ्यांची छाप यंदा दिसलीच नाही. नाव हवेत विरले आणि लाटेत राहणाऱ्या नावामुळे उमेदवार निवडून आले.
साधारण सदस्य ते बुथ कमिटीपर्यंत काम करणाऱ्या कार्यकर्त्याचा वाणवा होता. कार्यकर्त्यांवर पकड ठेवण्यात जिल्ह्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते कुठेतरी कमी पडल्याचे दिसून आले. भंडाऱ्यात राष्ट्रवादीचे अनेक नेते आपापल्या भागात वर्चस्व ठेवून आहेत. परंतू काही क्षेत्र वगळता कुठेही राष्ट्रवादीची पकड दिसून आली नाही. त्यामुळेच या मतदार संघात भाजपला चांगली मते मिळाली. (प्रतिनिधी)