तीन तलावात अत्यल्प जलसाठा

By Admin | Updated: August 30, 2015 00:24 IST2015-08-30T00:24:31+5:302015-08-30T00:24:31+5:30

तुमसर तालुक्यातील मोठ्या जलाशयात पाण्याचा ठणठणाट आहे. मार्च महिन्याची चाहूल आतापासून लागली असून पाण्याचे नियोजन कसे करावे या चिंतेने प्रशासनाला ग्रासले आहे.

Low water reservoir in three lakes | तीन तलावात अत्यल्प जलसाठा

तीन तलावात अत्यल्प जलसाठा

दप्तरदिरंगाई : गायमुख, कारली, बघेडा तलावांचा समावेश, सांसद ग्राम बघेडाचा समावेश
तुमसर : तुमसर तालुक्यातील मोठ्या जलाशयात पाण्याचा ठणठणाट आहे. मार्च महिन्याची चाहूल आतापासून लागली असून पाण्याचे नियोजन कसे करावे या चिंतेने प्रशासनाला ग्रासले आहे. दोन महिन्यापूर्वी राज्य पाटबंधारे विभागाने बावनथडी प्रकल्पातून पाण्याचा उपसा करण्याचे पत्र दिले होते. परंतु त्याची दखल न घेतल्याने आंबागड, कारली व बघेडा जलाशयात अत्यल्प पाणीसाठा आहे.
तुमसर तालुक्यात बावनथडी प्रकल्पामुळे हरितक्रांतीचे स्वप्न साकार होणार असे स्वप्न शासन व प्रशासनाने दाखविले. परंतु या प्रकल्पातून या मोसमात पाण्याचा उपसा आंबागड, कारली व बघेडा जलाशयात केला असता तर सिंचनाकरिता पाणी उपलब्ध झाले असते. दोन महिन्यापूर्वी राज्य पाटबंधारे विभागाने बावनथडी प्रकल्प कार्यालयाला पाणी उपसा करण्याचे प त दिले होते. परंतु त्या कार्यालयाकडून आतापावेतो उत्तर मिळाले नाही.
सद्यस्थितीत चांदपूर जलाशयात २७ टक्के जलसाठा आहे. आंबागड तलावात १३.६५ टक्के जलसाठा असून ३५.८३ हेक्टर तलाव क्षेत्र आहे. तलावाची सिंचन क्षमता २०८ हेक्टर आहे. कारली जलाशयात ३७ टक्के जलसाठा आहे. सिंचन क्षमता २६० हेक्टर असून तलावाचे क्षेत्र ७० हेक्टर आहे. बघेडा तलावात ४५ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. सिंचन क्षमता १४९८ हेक्टर इतकी असून तलावाचे क्षेत्र १३० हेक्टर इतके आहे.
नियमानुसार शेती सिंचनाकरिता २५ टक्के तलावात जलसाठा असणे आवश्यक असून त्यापेक्षा जास्त जलसाठा असला तरच सिंचनाकरिता पाणी देता येते. आंबागड, कारली व बघेडा तलावात पाणी उपसाची सोय आहे. आंबागड, कारली व बघेडा तलावात पाणी उपसाची सोय आहे. आंबागड तलाव सिंचनाकरिता उपलब्ध होणार नाही. येथे मासे नाही. व्यवसायही संकटात सापडला आहे. बघेडा हे गाव सांसद दत्तक ग्राम योजनेत समाविष्ट आहे हे विशेष. उन्हाळ्यात बघेडा तलावात पाणी उपसा करण्यात आला होता. या हंगामात पाणी उपसा झाले नाही. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Low water reservoir in three lakes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.