रोहयोच्या कामात अत्यल्प मजुरी
By Admin | Updated: February 27, 2016 01:05 IST2016-02-27T01:05:20+5:302016-02-27T01:05:20+5:30
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत नाला सरळीकरणाचे काम सुरू आहे.

रोहयोच्या कामात अत्यल्प मजुरी
मजुरांमध्ये असंतोष : जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष
कोंढा (कोसरा) : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत नाला सरळीकरणाचे काम सुरू आहे. त्या कामावरील मजुरांना अत्यल्प ६० ते ७० रूपये मजुरी मिळाल्याने त्यांच्यात प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे.
नाला सरळीकरणाचे काम १ फेब्रुवारी २०१६ पासून सुरू आहे. त्याकामावर ५६७ मजूर काम करीत आहे. २५ दिवसानंतर मजुरांच्या बँक खात्यात पहिला हप्ता जमा झाला आहे. मजुरांना आठवड्याचे ४०० ते ५०० रूपये मिळाले तर ग्रामपंचायत सदस्य असलेल्या मजुरांना १२०० ते १३०० रूपये जमा झाले, असा आरोप ग्रामपंचायत सदस्य बंडू येळणे व मजुरांनी केला आहे.
गावात २३ लाख ३२ हजार ७४२ रूपयाचा निधी नाला सरळीकरणासाठी मंजुर झाला आहे. त्यानुसार अनेक गावातील नागरिक व ग्रामपंचायत सदस्य देखिल रोजगार कार्ड तयार असल्याने कामावर जात आहेत. त्यांना जास्त मजुरी पडते. हा भेदभाव का, केला जात आहे, असा प्रश्न अनेक मजुर करीत आहे.
दिवसभर मेहनत करणारे मजूर यांना शासनाच्या प्रचलित दराप्रमाणे १८१ रूपये मजुरी मिळणे आवश्यक आहे पण ६० ते ७० मजुरी निघाल्याने मजुरामध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
या कामावर रोजगारसेवक म्हणून गोदरू बारसागडे काम पाहत आहेत. त्यांना या संबंधी विचारले असता प्रत्येक गटागटानुसार काम करण्यास सांगितले जाते. मी मजुरांची दररोज हजेरी लावतो.
तसेच कामाचे मोजमाप करून मजुरांचे पैसे काढले असे सांगितले काम किती झाला हे प्रत्येक गटानुसार मोजमाप केले जाते. तांत्रिक पॅनल पंचायत समिती पवनी येथील कर्मचारी येऊन कामाची लांबी २.६२ तसेच ३ मीटर रूंद व ०.३० घनमिटर उंची मोजून कामाचे बिल काढले जाते.
पवनी तालुक्यातील पिंपळगाव (नि.) येथे सध्या दोन गट असल्याने एकमेकावर आरोप प्रत्यारोप होत असते. अशी देखिल माहिती मिळाली आहे. पिंपळगाव (नि) येथील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कामाची चौकशी करून दोषीवर कारवाई करण्याची मागणी आहे. (वार्ताहर)