प्रेमीयुगूल विवाह बंधनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2016 02:27 IST2016-06-02T02:27:44+5:302016-06-02T02:27:44+5:30
जांभोरा येथे महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती व ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या सहकार्याने एका प्रेमीयुगुलांचा विवाह पार पडला.

प्रेमीयुगूल विवाह बंधनात
करडी (पालोरा) : जांभोरा येथे महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती व ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या सहकार्याने एका प्रेमीयुगुलांचा विवाह पार पडला. ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या या सोहळ्याला ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रशांत आसाराम मेश्राम (२६) रा.सावरबंध ता.साकोली तर दुर्गा योगराज भांडारकर (१९) रा.तेलंगखेडी ता.गोरेगाव जिल्हा गोंदिया यांचे एकमेकांवर प्रेम होते. या प्रेम विवाहाला मुलीच्या वडिलांची मंजुरी होती. परंतु मुलाचे आई-वडीलांचा विरोध होता. त्यामुळे मुलगा व मुलगी स्वमर्जीने जांभोरा येथील अरुण बंसोड यांचे घरी राहत होते. त्यांनी आपली प्रेम कहाणी अरुण बंसोड यांच्या कानावर घातली. तसेच लग्न करण्याची इच्छाही जाहीर केली. बंसोड यांनी महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीला याची माहिती दिली. दोघा प्रेमींनी समितीकडे रितसर अर्ज केला. समितीने सर्व बाजू तपासून लग्न लावून देण्यास सहमती दर्शविली.
त्यानुसार ३० मे रोजी गावकरी तसेच तंटामुक्त गाव समिती पदाधिकारी व ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या उपस्थितीत लग्न सोहळा पार पाडण्यात आला. यावेळी तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष राधेश्याम उईके, सरपंच भूपेंद्र पवनकर, माजी पं.स. सदस्य कवळू मुगमोडे, परमानंद मेश्राम, योगराज मेश्राम, विणा मेश्राम, सामाजिक कार्यकर्ता अंगेश दुपारे व गावकरी, पदाधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)