तंटामुक्त गाव समितीच्या साक्षीने प्रेमीयुगुलाचे मिलन
By Admin | Updated: July 24, 2016 00:34 IST2016-07-24T00:34:41+5:302016-07-24T00:34:41+5:30
आईवडिलांचा विरोध झुगारून एका प्रेमीयुगुलाने लग्नाचा निर्धार केला. त्यांचे मनोमिलन चिचाळ महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घडवून आणला.

तंटामुक्त गाव समितीच्या साक्षीने प्रेमीयुगुलाचे मिलन
प्रकाश हातेल चिचाळ
आईवडिलांचा विरोध झुगारून एका प्रेमीयुगुलाने लग्नाचा निर्धार केला. त्यांचे मनोमिलन चिचाळ महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घडवून आणला.
महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीने या प्रेमीयुगुलाची समजूत घालून गावातील उपसरपंच, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील यांच्या उपस्थितीत चिचाळ येथील तंटामुक्त समितीने प्रेमीयुगुलाचा सोहळा घडवून आणला. चंद्रपूर जिल्ह्यातील नेरी येथील संजय जानबा (२२) यांचे घरासमोरील पौर्णिमा संजय पिसे (१९) हिच्यावर दोन वर्षापासून प्रेम होते. परंतु वरपक्षाकडून लग्नाची मागणी करण्यात आली तेव्हा मुलीच्या वडीलांनी लग्नास विरोध केला. प्रेमीयुगुलांनी गावातून पलायन करून चिचाळ येथील वराचे नातेवाईक माजी सभापती लघु खोब्रागडे यांच्या सहकार्याने महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष श्रीकृष्ण काटेखाये व त्यांचा सदस्यांनी पुढाकार घेऊन वर व वधू पक्षाशी संपर्क करून समजूत घातली. शेवटी नकारात्मक बाजूचा विचार सोडून सकारात्मक भूमिका वर वधू पक्षाने घेतली.
तंटामुक्त समितीच्या सहकार्याने लहू खोब्रागडे यांचे आवारात सर्वांच्या उपस्थितीत लग्न लावले. दोन जीवांचे मनोमिलन घडवून आले. उपस्थितीत मान्यवरांनी क्षमतेप्रमाणे भेट म्हणून रुपये दिले व दोघांचे जीवन सुखात जावो, असा आशीर्वाद दिला. या प्रसंगी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्रीकृष्ण काटेखाये, पोलीस पाटील तुकेश वैरागडे, उपसरपंच दिलीप रामटेके, सरपंचा उषा काटेखाये, माजी सरपंच मुनीश्वर काटेखाये, महादेव उके, रुपचंद उके, लघु खोब्रागडे, प्रभावती खोब्रागडे, राजू काटेखाये, चंद्रशेखर काटेखाये, भूपेश काटेखाये, मधुसुदन काटेखाये, पंकज काटेखाये व ग्रामस्थ उपस्थित होते.