प्रेमीयुगुलाचा आत्महत्येचा प्रयत्न
By Admin | Updated: February 19, 2016 01:08 IST2016-02-19T01:08:30+5:302016-02-19T01:08:30+5:30
प्रेमविवाहाला घरचा होत असलेला विरोध बघून एका प्रेमीयुगलांनी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र

प्रेमीयुगुलाचा आत्महत्येचा प्रयत्न
मोहाडी : प्रेमविवाहाला घरचा होत असलेला विरोध बघून एका प्रेमीयुगलांनी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र तातडीने उपचार करण्यात आल्याने त्या दोघांचीही प्रकृती धोक्याबाहेर आहे.
मोहाडी तालुक्यातील रोहणा येथील एका युवक-युवतीचे एकमेकांवर प्रेम हाते. त्यांचे प्रेम प्रकरण अनेक दिवसापासून सुरू होते याची चाहुल मुलीच्या वडिलांना लागताच त्यांनी या दोघांच्या लग्नाला विरोध केला. हे प्रेमीयुगल एकाच समाजाचे असल्याने त्यांनी लग्न करण्याचा बेत आखला. मात्र मुलीच्या वडिलांनी मुलीचे लग्न दुसऱ्या ठिकाणी जुळवून घेतले. याची माहिती प्रियकराला होताच त्याने मुलीला जाब विचारला. मुलगीही वडिलांनी ठरविलेल्या लग्नाच्या विरोधात असून प्रियकरासोबत लग्नाला तयार झाली. मात्र पळून लग्न करण्याची त्यांची हिम्मत झाली नाही. शेवटी त्यांनी आत्महत्येचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रियकराने प्रेयसीला घरी बोलावले. घराच्या समोरील दरवाजाला कुलूप लावून दोघांनीही विषप्राशन केले. विष घेतल्याने दोघेही बेशुद्ध झाले. घराला कुलूप असल्याने कोणाचेही लक्ष गेले नाही. बराच वेळ होऊनही मुलगी घरी परतली नसल्याने शोधाशोध सुरू झाली. संशय आल्याने मुलाच्या घराच्या मागच्या दाराने प्रवेश केला असता दोघेही बेशुद्ध स्थितीत आढळून आले. त्यांना त्याच स्थितीत बाहेर काढून जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असून आता त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. (शहर प्रतिनिधी)