पहेला: भंडारा तालुक्यातील डोंगरगाव येथील राजकुमार वरकडे आणि साकोली तालुक्यातील मालुटोला येथील रहिवासी नलिनी खंडाते या दोन प्रेमीयुगलाचा शुभमंगल सोहळा गोलेवाडी येथील ग्रामपंचायत पटांगणात तंटामुक्त समिती आणि ग्रामपंचायतचे पदाधिकारी यांच्या सहकार्याने पार पडले. यावेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संजय ठवकर, उपाध्यक्ष शामराव पडोळे, सरपंच दिपक पाटील, ग्रामपंचायत सदस्य फुलचंद दहिवले, लिलाधर मेश्राम, ताराचंद वासनिक तसेच ग्रामपंचायतचे पदाधिकारी आणि तंटामुक्त समितीचे सदस्यगण तसेच डोंगरगाव आणि गोलेवाडी येथील नागरिकांनी नवदांपत्याना आर्शिवाद दिला. (वार्ताहर)
तंटामुक्त समितीच्या सहकार्याने प्रेमीयुगुलाने थाटला संसार
By admin | Updated: April 16, 2016 00:27 IST