पौष्टिक तत्त्वांनी भरपूर असणाऱ्या भोंबोळीची धूम

By Admin | Updated: August 13, 2015 01:30 IST2015-08-13T01:30:41+5:302015-08-13T01:30:41+5:30

श्रावण महिन्यात शुद्ध शाकाहारी असलेल्या भोंबोळीने (मशरूम) सध्या भंडारा जिल्ह्यात धूम केली आहे.

A lot of nostril | पौष्टिक तत्त्वांनी भरपूर असणाऱ्या भोंबोळीची धूम

पौष्टिक तत्त्वांनी भरपूर असणाऱ्या भोंबोळीची धूम


लाखनी : श्रावण महिन्यात शुद्ध शाकाहारी असलेल्या भोंबोळीने (मशरूम) सध्या भंडारा जिल्ह्यात धूम केली आहे. खवय्यांकडून भोंबोळीची खरेदी केली जात आहे. पौष्टिक तत्त्वांनी भरपूर असणाऱ्या भोंबोळीची त्यामुळेच मागणी अधिक होत आहे.
विशिष्ट चव आणि पौष्टिकतेमुळे भोंबोळीची भाजी मांसाहाराला पर्याय असल्याचे खवय्ये मानतात. ही भाजी त्यांच्या जिभेचे चोचले पूर्ण करीत आहे. त्यामुळेच अधिक भावातही या भोंबोळीची हातोहात विक्री होत असल्याचे येथे दिसून येत आहे. सध्या ३०० ते ४०० रुपये प्रतिकिलो दराने भोंबोळीची विक्री होत आहे.
एवढी महाग असतानाही या वनस्पतिजन्य भाजीचे चाहते मात्र खुल्यादिलाने ती खरेदी करून पार्टी करीत आहेत. आकाशात वीजा कडाडल्या की, शेतशिवार व जंगलात भोंबोळी उगवते अशी ग्रामीण भागातील लोकांची मान्यता आहे. पांढऱ्या रंगाच्या शेंगासारख्या या भोंबोळीत अत्यंत पौष्टिक तत्त्व असल्याचे म्हटले जाते. भंडाऱ्यात मोठा बाजारात रस्त्याच्या कडेला भोंबोळी विक्रेत्यांची दुकाने असतात. सकाळपासून विक्रेत्यांच्या अवती-भोवती लोकांची गर्दी दिसून येते. वर्षातून एकदाच येणाऱ्या भोंबोळी खरेदीसाठी पुरूषांसह महिलांचीही गर्दी दिसून येत आहे.केवळ पावसाळ्यातील काही मोजक्या दिवसातच जंगली भागात उगवणाऱ्या या वनस्पतीची भाजी वर्षातून एकदा तरी खावी, असा सल्लाही जाणकार देतात. मोठा बाजार चौकात भोंबोळी घेऊन ग्रामीण भागातील महिला दुकाने थाटत असल्याने येथे हमखास गर्दी दिसून येते. (तालुका प्रतिनिधी)
विद्युतच्या धक्याने कर्मचाऱ्याच्या मृत्यू
भंडारा: विजेच्या जिवंत तारांना पायाचा स्पर्श झाल्याने ३५ वर्र्षीय लाईनमेनचा मृत्यू झाला. रमेश सुखदेवराव ठाकरे मुळ रा. पाडोडी (जि.वाशिम) असे मृताचे नाव आहे.

Web Title: A lot of nostril

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.