शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
5
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
6
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
7
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
8
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
9
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
10
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
11
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
12
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
13
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
14
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
15
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
16
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
17
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
18
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
19
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
20
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?

अग्निकांडानंतर वर्षभरात पालटले भंडारा रुग्णालयाचे रुपडे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2022 08:46 IST

साडेतीन काेटींचा निधी; ‘लाेकमत’च्या आक्रमक भूमिकेचे यश

- ज्ञानेश्वर मुंदेलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : अकरा चिमुकल्यांचा बळी घेणाऱ्या अग्निकांडानंतर भंडारा जिल्हा रुग्णालयाचे रुपडे पालटले असून अग्निशमन यंत्रणा, इलेक्ट्रिक दुरुस्ती आणि नवजात शिशू कक्ष उभरण्यासाठी साडेतीन काेटींचा निधी प्राप्त झाला. ‘लाेकमत’ने सुरुवातीपासूनच घेतलेल्या आक्रमक भूमिकेने निधी उपलब्ध होण्यास मदत झाली. मात्र काेराेनाच्या दुसऱ्या लाटेने कामात अडथळा आणल्याने वर्षभरानंतरही नवजात शिशू कक्ष सुरू झालेला नाही. 

जिल्हा रुग्णालयातील नवजात शिशूंच्या अतिदक्षता कक्षात ९ जानेवारी २०२१ राेजी पहाटे आग लागली. यात दहा बालकांचा हाेरपळून मृत्यू झाला तर एका बालकाचा घटनेनंतर २१ दिवसांनी मृत्यू झाला हाेता. या घटनेनंतर रुग्णालयातील आराेग्य यंत्रणेत कमालीची सुधारणा झाली. ‘लाेकमत’नेही याबाबत आक्रमक भूमिका घेत आराेग्य यंत्रणा सुधारण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला. आग लागल्यास तापमानाने पाईपमधील पॉईंट वितळून पाण्याच्या मारा सुरू हाेईल.

असा झाला बदलnअग्निशमन यंत्रणेसाठी १.९२ कोटी निधीnफायर हायड्रन्ट, अग्निशमन यंत्रणा कार्यरतnवीज दुरुस्तीसाठी ४० लाख nनवजात शिशू कक्षासाठी एक काेटींच्या निधीतून यंत्रांची खरेदीn३६ इनक्युबेटर दाखल, कक्षाचे काम आता अंतिम टप्यात

आमचे बाळ हिरावले पण...वर्षभरापूर्वी लागलेल्या आगीत आमचे चिमुकले डाेळ्यादेखत हिरावले. या घटनेतील दाेषींवर कारवाईही हाेईल. मात्र पुन्हा अशी घटना कुठेच घडू नये अशी खबरदारी घ्यावी, असे या अग्निकांडात आपल्या काळजाचा तुकडा हरविलेल्या मातांनी शासनाला आर्त हाक दिली आहे. 

परिचारिकांवर आराेपपत्र दाखलअग्निकांडाला दाेषी धरून परिचारिका स्मिता आंबिलढुके आणि शुभांगी साठवणे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. परिचारिका जामिनावर असून दीड महिन्यांपूर्वी न्यायालयात आराेपपत्र दाखल झाले. तर तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक प्रमाेद खंडाते यांना निलंबित केले हाेते.

टॅग्स :Bhandara Fireभंडारा आग