लोकमत इव्हेन्ट्सचा उपक्रम : सहभागी व्हा... पर्यावरण वाचवा

By Admin | Updated: September 18, 2015 00:38 IST2015-09-18T00:38:58+5:302015-09-18T00:38:58+5:30

लोकमत इव्हेन्ट्सतर्फे गणेशोत्सवानिमित्त दि.१८ ते २५ सप्टेंबर दरम्यान इको फ्रेन्डली गणेश स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

Lokmat Events: Participate ... Save the Environment | लोकमत इव्हेन्ट्सचा उपक्रम : सहभागी व्हा... पर्यावरण वाचवा

लोकमत इव्हेन्ट्सचा उपक्रम : सहभागी व्हा... पर्यावरण वाचवा

इको फ्रेन्डली गणेश स्पर्धा आजपासून
भंडारा : लोकमत इव्हेन्ट्सतर्फे गणेशोत्सवानिमित्त दि.१८ ते २५ सप्टेंबर दरम्यान इको फ्रेन्डली गणेश स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धा घरी मांडण्यात येणाऱ्या गणपतीशी संबंधीत असून विजयी स्पर्धकांना भेटवस्तू व बक्षिस देवून गौरविण्यात येईल.
इको फ्रेन्डली गणेश स्पर्धेत गणेश मुर्ती, मखर, सजावट, आभूषणे व विसर्जन पर्यावरण पूरक असावे, स्पर्धा खुली प्रकाराची असून भंडारा शहरातील सदस्य किंवा लोकमत वाचक स्पर्धेत नि:शुल्क सहभागी होऊ शकतात. दिलेल्या कालावधीत परिक्षक प्रत्यक्षरित्या भेट देवून गुणानुक्रम देतील. दिनांक १९ सप्टेंबर पर्यंत पुर्ण नाव, पत्ता, संपर्क क्रमांक इत्यादी माहिती एसएमएस किंवा दूरध्वनीद्वारे नोंदणी करणे आवश्यक आहे.
अधिक माहितीकरिता कार्यक्रम संयोजक ललीत घाटबांधे ९०९६०१७६७७, सखी मंच जिल्हा संयोजिका सीमा नंदनवार ८०८७१६२३५२ किंवा नोंदणी प्रमुख स्रेहा वरकडे ८४८४०७९८५७ यांच्याशी संपर्क साधावा. (मंच प्रतिनिधी)

Web Title: Lokmat Events: Participate ... Save the Environment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.