शहरं
Join us  
Trending Stories
1
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैन्याची थट्टा; फक्त १० रुपयांत गणवेश-हेल्मेट विक्रीला, व्हिडीओ व्हायरल
4
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?
5
केएल राहुलचा 'डबल' धमाका! विराट कोहली आणि रोहित शर्माचा कसोटीतील मोठा विक्रम मोडला
6
तुम्हीही टोल भरताय? मग जाणून घ्या, देशात 'या' लोकांना नियमानुसार मिळते टोलमधून थेट सूट!
7
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
8
World Smile Day: ज्याला मिम मटेरिअल समजता, त्याने नुसतं हसून कमावले ३ मिलियन डॉलर!
9
हात पकडून जोरात ओढले..; तीन वर्षीय चिमुकलाने वाचवला आईचा जीव; पाहा धक्कादायक Video
10
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
11
भारतीय कंपनी आणतेय ७००० mah बॅटरीवाला प्रिमिअम फोन, ‘Pixel’ सारखा कॅमेरा डिझाइन; पण किंमत नसेल स्वस्त...
12
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
13
दसरा मेळाव्यानंतर नवा वाद! रामदास कदमांचा धक्कादायक दावा, संजय राऊतांचं संतप्त प्रत्युत्तर
14
माणसाचं तारुण्यच 'संकटात', नवीन विषाणुमुळे...; बाबा वेंगाची हादरवून टाकणारी भविष्यवाणी काय?
15
ITR चुकला? घाबरू नका, 'या' तारखेपर्यंत भरा बिलिटेड रिटर्न; पण, इतका दंड आणि व्याज भरावे लागणार
16
"भारतीय कंपन्या 'क्रोनीझम'ने नाही, तर..", राहुल गांधींचे कोलंबियातून भाजपवर टीकास्त्र
17
Video - अग्निकल्लोळ! लॉस एंजेलिसमध्ये रिफायनरीला भीषण आग, परिसरात धुराचं साम्राज्य
18
मारुतीचं साम्राज्य धोक्यात...? ह्यूंदाई-महिंद्राला पछाडत 'ही' कंपनी बनली देशातली No.2 ब्रँड! 'MS' पासून फक्त एक पाऊल दूर
19
हृदयद्रावक! कफ सिरप पिऊन झोपला अन् उठलाच नाही; मोफत औषधामुळे मुलाचा मृत्यू
20
Bigg Boss 19: आता खरी मजा येणार! भारतीय क्रिकेटरची बहीण 'बिग बॉस'च्या घरात येणार, कोण आहे ती?

Lok Sabha Election 2019; भंडारा-गोंदिया जिल्ह्याचा विकास खुंटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 21:52 IST

देशात गत पाच वर्षाच्या काळात सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व कृषी विषयक धोरण पार कोलमडून पडले आहे. भंडारा - गोंदिया जिल्ह्याचा विकास खुंटला आहे. पाच वर्षात एकही मोठा उद्योग सरकार आणू शकले नाही.

ठळक मुद्देप्रफुल्ल पटेल : चौफेर विकासासाठी युपीएची गरज, ठिकठिकाणी प्रचार सभा

लोकमत न्युज नेटवर्कभंडारा : देशात गत पाच वर्षाच्या काळात सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व कृषी विषयक धोरण पार कोलमडून पडले आहे. भंडारा - गोंदिया जिल्ह्याचा विकास खुंटला आहे. पाच वर्षात एकही मोठा उद्योग सरकार आणू शकले नाही. जिल्ह्यात विकासाची गंगा आणायची असेल तर युपीए सरकारशिवाय पर्याय नाही. असे प्रतिपादन खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले.भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी-काँग्रेसचे उमेदवार नाना पंचबुद्धे यांच्या प्रचारार्थ भंडारा तालुक्यातील शहापूर, परसोडी, बेला, वरठी, मोहाडी, आंधळगाव, जांब, कांद्री आणि भंडारा शहरातील विविध ठिकाणी आयोजित सभेत ते बोलत होते. सभेला उमेदवार नाना पंचबुद्धे, आमदार प्रकाश गजभिये, जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष प्रेमसागर गणवीर, माजी आमदार आनंदराव वंजारी, जिया पटेल, तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष राजकपूर राऊत, दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष रामलाल चौधरी,स भापती प्रेमदास वनवे, अ‍ॅड.किशोर लांजेवार, दीनदयाल देशभ्रतार, नंदू झंझाड, नरेश डहारे, शिशीर वंजारी, जया सोनकुसरे, पूजा ठवकर, भाऊ कातोरे, नरेंद्र झंझाड, नरेंद्र बुरडे, मनीष वासनिक, डॉ.रवींद्र वानखेडे उपस्थित होते.प्रफुल्ल पटेल म्हणाले, आम्ही जिल्ह्याचा विकास केला. येथे एक आयुध निर्माणी कारखाना सुरु करण्यात आला. खासदार असताना दोन मोठे कारखाने आणले. एमआयडीसी निर्माण केली. शेतकऱ्यांच्या धानाला हमीभाव दिला. मात्र या सरकारने सर्वच आघाड्यांवर जनतेची फसवणूक केली. येत्या निवडणुकीत आम्हाला निवडून दिल्यास शेतकऱ्यांच्या धानाला ३२०० रुपये भाव व बोनस हमखास देऊ, गरीब कुटुंबांना प्रती माह ६ हजार रुपये देण्याचा आमचा वचननामा आहे. विकासाची गंगोत्री आणण्यासाठी युपीएची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.परसोडी येथील सभेचे प्रास्ताविक दीनदयाल देशभ्रतार यांनी, संचालन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुमेध शामकुवर यांनी केले. खासदार पटेल म्हणाले, गेल्या निवडणुकीत मोदी सरकारने अनेक आश्वासने दिले होती. अच्छे दिनचे स्वप्न दाखविले होते. पेट्रोल डिझेलचे भाव वाढत असून नोटबंदीमुळे रोजगार कमी झाले आहेत. शेतकरीही समस्याग्रस्त झाले असून त्यांच्या आत्महत्येत वाढ होत आहे. त्यामुळे या सरकारला जनताच आता कंटाळली आहे, असे त्यांनी सांगितले.प्रफुल्ल पटेल व वर्षा पटेल ३० मार्चला भंडारा जिल्ह्यातभंडारा : काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार नाना पंचबुद्धे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल आणि मनोहरभाई पटेल अकॅडमीच्या अध्यक्ष वर्षा पटेल यांचा ३० मार्च रोजी भंडारा तालुक्यात दौरा आयोजित आहे. खासदार प्रफुल्ल पटेल शनिवारी सकाळी ११ वाजता लाखांदूर तालुक्यातील भागडी, १२ वाजता विरली खुर्द त्यानंतर पवनी तालुक्यातील पौना येथे दुपारी १.३० वाजता, दुपारी २ वाजता मांगली बाजार, दुपारी ३ वाजता आसगाव, दुपारी ४.३० वाजता कोंढा कोसरा, सायंकाळी ६ वाजता चिचाळ, सायंकाळी ७.१५ वाजता पवनी येथील गांधी चौकात सभा घेणार आहे तर रात्री ८.३० वाजता पवनी तालुक्यातील भुयार येथे सभा घेतील.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकprafull patelप्रफुल्ल पटेल