लोकमत न्यूज नेटवर्ककोंढा (कोसरा) : लोहार समाजाच्या लोकांना जबर मारहाण करून खोटे गुन्हे लावणाºया लोकांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भंडारा जिल्हा लोहार समाज मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पवनी येथील तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले.सोलापूर जिल्ह्यातील अंकुश दगडू लोहार व त्यांची पत्नी वैशाली लोहार रा.बेंबळे ता.माढा यांच्यावर गावातील औदूंबर दत्तू शेळके यांनी जुन्या वैमनस्यातून भादंवि कलम ४३५, ४३६ अन्वये गुन्ह्यात अडविले. तसेच जबर मारहाण केली. टेंभूर्णी येथील पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्यावर दबाव आणून त्यांना हाताशी धरून ऊसाचे शेत पेटवून दिले.तसेच शेतातील घर पेटवून दिल्याची खोटी तक्रार दाखल केली. या खोट्या प्रकरणात अंकुश लोहार व त्यांच्या पत्नीला कारागृहामध्ये रवानगी करण्यात आली. औदूंबर दत्तू शेळके याच्यावर कारवाई करण्यात यावी, तसेच खोटे गुन्हे दाखल करणाऱ्याटेंभुर्णी पोलीस स्टेशनच्या या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी केली आहे. एक महिन्यात सदर प्रकरणाची चौकशी न केल्यास लोहार समाज मंडळातर्फे आंदोलन करण्याचा इशारा तहसीलदार निलीमा रंगारी यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. शिष्टमंडळात भंडारा जिल्हा लोहार समाज मंडळाचे अध्यक्ष प्रा.चरणदास बावणे व पदाधिकारी सुनील सूर्यवंशी, मुन्ना मेश्राम, गंगाधर बावणे आदी उपस्थित होते.
बनावट गुन्हे दाखल करणाऱ्यांविरुद्ध कारवाईची लोहार समाज मंडळाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 05:01 IST