बोदरा ग्रामपंचायतीला गावकऱ्यांनी ठोकले कुलूप
By Admin | Updated: January 27, 2015 23:27 IST2015-01-27T23:27:40+5:302015-01-27T23:27:40+5:30
२६ ला ग्रामपंचायत कार्यालय बोदरा येथे ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या ग्रामसभेमध्ये अध्यक्ष सरपंच यांनी उपस्थित नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नाची समाधानकारक उत्तरे न देता निघून गेले.

बोदरा ग्रामपंचायतीला गावकऱ्यांनी ठोकले कुलूप
साकोली : २६ ला ग्रामपंचायत कार्यालय बोदरा येथे ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या ग्रामसभेमध्ये अध्यक्ष सरपंच यांनी उपस्थित नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नाची समाधानकारक उत्तरे न देता निघून गेले. त्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी चक्क ग्रामपंचायतलाच कुलूप ठोकले. या कुलूपबंद आंदोलनामुळे आज दिवसभर ग्रामपंचायतचे कामकाज बंद राहिले.
बोदरा ग्रामपंचायत कार्यालयात दुपारी ग्रामसभा सुरु झाली. या ग्रामसभेला अध्यक्ष म्हणून सरपंच शांता पुरामकर होत्या. यावेळी गावकऱ्यांनी अनेक प्रश्न विचारले. यात करवसुली मागणीचे पत्र पाठविणे, यासह इतरही प्रश्नांचा समावेश होता. मात्र या प्रश्नांचे सरपंच यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाही. व त्या ग्रामसभा अर्धवट सोडून निघुन गेल्या, असा आरोप गावकऱ्याचा आहे.
यानंतर उपस्थित गावकऱ्यानी वेळेवर नारायण कळपते यांची दुसऱ्यांदा अध्यक्ष म्हणून निवड केली व ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले. जोपर्यंत आमच्या प्रश्नांचे समाधानकारक उत्तर मिळणार नाही. तोपर्यंत कुलूप उघडणार नाही अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली. त्यामुळे आज दिवसभर ग्रामपंचायत कार्यालय बंद होते.
सदर प्रकरणाची तक्रार पोलिस स्टेशन साकोली येथे देण्यात आली आहे.(तालुका प्रतिनिधी)