समाज कल्याण कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा
By Admin | Updated: August 16, 2014 23:19 IST2014-08-16T23:19:36+5:302014-08-16T23:19:36+5:30
जिल्ह्यात यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेखाली भटक्या विमुक्त समाजाचे पुनर्वसन करावे. अंदाजपत्रकातील ४८ कोटींची तरतूद समाजबांधवांना उपलब्ध करून द्यावी आदी मागण्यांसाठी

समाज कल्याण कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा
भंडारा : जिल्ह्यात यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेखाली भटक्या विमुक्त समाजाचे पुनर्वसन करावे. अंदाजपत्रकातील ४८ कोटींची तरतूद समाजबांधवांना उपलब्ध करून द्यावी आदी मागण्यांसाठी समाजकल्याण उपायुक्त कार्यालयाला ताला ठोकण्याचा इशारा आदिवासी पारधी समाजपरिवर्तन फाउंडेशनच्या वतीने दिला आहे.
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेचा आदेश निघून चार वर्षे उलटली असतानाही जिल्हा प्रशासनाच्या वेळकाढू कारभारामुळे भटक्या विमुक्त समाजाचे पुनर्वसन होऊ शकले नाही. त्यांचे जीवनस्तर उंचावेल यासाठी ४८ कोटींची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली. मात्र त्याचा पैसा समाजबांधवांना प्राप्त झाला नाही. भटक्या विमुक्त समाजाच्या उत्थानासाठी समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून अनेक योजना अमलात आणल्या आहेत.
भंडारा जिल्ह्यातील भटक्या विमुक्त जाती जमाती व मांग गारुडी समाजाला शिबिरे घेऊन जातीचे दाखले, बीपीएल रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र तात्काळ देण्यात यावे, वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळाचा लाभ देण्यात यावा आदी मागण्यांसाठी १९ आॅगस्टला समाजकल्याण आयुक्त कार्यालयाला ताला ठोको आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा आदिवासी पारधी समाज परिवर्तन फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष पवार यांनी दिला आहे. (शहर प्रतिनिधी)