मेगा ब्लॉकमुळे लोकल गाड्या रद्द
By Admin | Updated: February 27, 2016 01:02 IST2016-02-27T01:02:56+5:302016-02-27T01:02:56+5:30
सुरक्षित आनंददायी व निर्धारित वेळेवर प्रवासी रेल्वेगाड्याला पोहोचतील अशी घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वे अंदाजपत्रकाची घोषणा करताना केली.

मेगा ब्लॉकमुळे लोकल गाड्या रद्द
शेकडो प्रवाशांना फटका : एक्स्प्रेस गाड्या मात्र सुरु
तुमसर : सुरक्षित आनंददायी व निर्धारित वेळेवर प्रवासी रेल्वेगाड्याला पोहोचतील अशी घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वे अंदाजपत्रकाची घोषणा करताना केली. परंतु १२ तासानंतरच मेगा ब्लॉककरिता आम आदमीची लोकल प्रवाशी गाडी शुक्रवारी रद्द करण्यात आली. डाऊन रेल्वे ट्रकवर गुरूवारी रात्री ८ ते १२ असा मेगा ब्लॉक असताना दुपारची दुर्ग-इतवारी लोकल रद्द करण्यात आली. याचा फटका शेकडो सर्वसामान्य प्रवाशांना बसला.
दुर्ग-इतवारी लोकल दूपारी इतवारी (नागपूर) कडे जाते. तुमसर रोड रेल्वे स्थानकावर शेकडो प्रवासी या गाडीची वाट बघत होते. मेगा ब्लॉक असल्याने लोकल रद्द झाल्याचे कळल्यावर शेकडो प्रवाशांना आल्या पावली परतावे लागले.
यामुळे लहान मुले, वृध्द पुरुष महिलांना याचा फटका बसला यासंदर्भात रेल्वे प्रशासनाने माहिती दिली होती, परंतु सर्वसामान्य नागरिकांना यांची माहिती रेल्वे स्थानकावर आल्यानंतरच मिळाली.
डाऊन रेल्वे ट्रकवर शुक्रवारी रात्री ८ ते १२ पर्यंत रेल्वे प्रशासनाने मेगा ब्लॉक केला होता. त्यामुळे लोकल सोबत काही प्रवासी व मालगाड्या या मार्गावर रद्द करण्याची येथे गरज नव्हती. मेगा ब्लॉकचा वेळ हा रात्रीचा होता.
दुसरीकडे एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या नाही. प्रवासी गाडी रद्द करण्याचा निर्णय नागपूरच्या झोनल कार्यालयातून घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)