कर्जमाफीचा उतारा आता शेतकºयांच्या मानगुटीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 23:42 IST2017-08-17T23:41:38+5:302017-08-17T23:42:13+5:30
भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळाला तोंड देत आहे. असे असताना मागीलवर्षीच्या दुष्काळाची परतफेड करण्यासाठी शासनाने दहा पानाचा आॅनलाईन उतारा आता शेतकºयांच्या मानगुटीवर आणून बसविला आहे.

कर्जमाफीचा उतारा आता शेतकºयांच्या मानगुटीवर
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळाला तोंड देत आहे. असे असताना मागीलवर्षीच्या दुष्काळाची परतफेड करण्यासाठी शासनाने दहा पानाचा आॅनलाईन उतारा आता शेतकºयांच्या मानगुटीवर आणून बसविला आहे. कर्जमाफीच्या नावावर शेतकºयांना वेठीस धरण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केला.
लाखांदूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात आयोजित कार्यकर्ता सभेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, अविनाश ब्राम्हणकर, वासुदेव तोंडरे उपस्थित होते. यावेळी खा.पटेल म्हणाले, शासनाने कर्जमाफीचे धोरण हे शेतकºयांसाठी डोकेदुखी ठरली आहे. आॅनलाईनमुळे ‘नको रे बाबा पीक कर्ज’ असे म्हणण्याची वेळ बळीराजावर आली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्याशी चर्चा करून कर्जमाफीची आॅनलाईन प्रणाली बंद करण्याची मागणी केल्याचे सांगितले. शेतकºयांना मुबलक वीज पुरवठा झाला पाहिजे, पीक कर्ज तातडीने मिळाले पाहिजे. सध्या भंडारा-गोंदिया जिल्ह्यात अपुºया पावसामुळे दुष्काळसदृष्य स्थिती निर्माण झालेली असताना राज्य शासनाने ठोस उपाययोजना करून, शेतकºयांना मदतीचा हात द्यावा. जेणेकरून शेतकºयांवर आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही. येत्या काळात सत्तेत येण्यासाठी आतापासुनच दोन्ही जिल्ह्यातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी शेतकºयांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहुन न्याय मिळवुन देण्यासाठी तत्पर राहण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी बालु चुन्ने, सुभाष राऊत, देविदास राऊत, गोपीचंद राऊत, दीपक चिमनकर, धनराज ढोरे, प्रियंक बोरकर, कल्पना जाधव, विनोद ढोरे, देवेंद्र चौबे यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.