बालकांकरिता लिटील स्टार बेबी फॅशन शो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:43 IST2021-07-07T04:43:37+5:302021-07-07T04:43:37+5:30

०५ लोक ११ के भंडारा: लोकमत बाल विकास मंच व बचपन प्ले स्कूल भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने ६ ते ...

Little Star Baby Fashion Show for Kids | बालकांकरिता लिटील स्टार बेबी फॅशन शो

बालकांकरिता लिटील स्टार बेबी फॅशन शो

०५ लोक ११ के

भंडारा: लोकमत बाल विकास मंच व बचपन प्ले स्कूल भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने ६ ते १२ जुलै दरम्यान 'लिटील स्टार' बेबी फॅशन शो या ऑनलाइन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील २ वर्षे ते ८ वर्षे वयोगटातील विद्यार्थी नि:शुल्क सहभाग घेऊ शकतात. विजयी स्पर्धकांना बक्षीस व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल.

स्पर्धेकरिता आपल्या आवडत्या फॅन्सी ड्रेस कॅरेक्टरची वेशभूषा करून त्यासंबंधी संवाद असणारा (उदाहरणार्थ फुल, फळ, प्राणी, घड्याळ, भाजीवाला, ऐतिहासिक, अध्यात्मिक व्यक्तिमत्त्व, थोर पुढारी, नेते) हा व्हिडिओ ३० ते ६० सेकंदाचा असावा. कोणत्याही प्रकारची एडिटिंग न करता व्हिडिओ आम्हाला व्हाॅट्स ॲपवर सेंड करायचा आहे.

सोबतच स्वतःचा परिचय पूर्ण नाव, शाळेचे नाव, जन्मतारीख, वय व स्पर्धेचे नाव लिहून व्हिडिओ पाठवायचा आहे. मोबाइल किंवा कॅमेरा सेट करून व्हिडिओ तयार करावा. व्हिडिओमध्ये आवाज ऐकायला व दिसायला स्पष्ट हवे व स्पर्धेकरिता आई-वडील पालकांचे सहकार्य घेता येईल. अधिक माहिती व व्हाॅट्स ॲपकरिता बालविकास मंच संयोजक ललित घाटबांघे (९०९६०१७६७७) यांच्याशी संपर्क साधावा.

Web Title: Little Star Baby Fashion Show for Kids