शौचालय बांधकामाच्या वादातून तरूणाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 00:53 IST2018-04-13T00:53:49+5:302018-04-13T00:53:49+5:30

शौचालय बांधकामाच्या वादातून कुºहाडीने युवकाची हत्या करण्यात आली. बुधवात्री रात्री ९.३० वाजताच्या सुमारास जुना आंबागड येथे घडली. दिलीप शिवाजी कोडापे (३५) असे मृतकाचे नाव आहे.

Litter blood for the construction of toilets | शौचालय बांधकामाच्या वादातून तरूणाचा खून

शौचालय बांधकामाच्या वादातून तरूणाचा खून

ठळक मुद्देआबांगड येथील घटना : आंधळगाव पोलिसांनी केली आरोपीला अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर/आंधळगाव : शौचालय बांधकामाच्या वादातून कुºहाडीने युवकाची हत्या करण्यात आली. बुधवात्री रात्री ९.३० वाजताच्या सुमारास जुना आंबागड येथे घडली. दिलीप शिवाजी कोडापे (३५) असे मृतकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीसांनी वासुदेव नथ्यू इडपाचे (४०) रा. जुना आबांगड याला अटक केली आहे.
तुमसर तालुक्यातील आंबागडला लागून असलेला जुना आबांगड येथे आदिवासी वस्ती आहे. दिलीप कोडापे व वासुदेव इडपाचे हे शेजारी राहतात. कोडापे यांच्याकडे शौचालयाचे बांधकाम काही दिवसापासून सुरु आहे. त्यातुनच वासुदेव यांचे कोडापे यांच्याशी भांडण होत होते. बुधवारी पुन्हा भांडण झाले.
त्यात दिलीप आणि वासुदेव यांच्यात वाद गेला. भांडण सोडविण्यासाठी दिलीप यांची पत्नी व सासु मधात आली. वासुदेवने त्यांना पण काठीने मारले.
संतप्त झालेल्या वासुदेवने जनावरांच्या गोठ्यातून छोटी कुऱ्हाड आणून दिलीपच्या डोक्यावर वार केले. यातच दिलीप कोडापे यांचा मृत्यू झाला. घटनास्थळी लोकांची गर्दी झाली. आंधळगाव पोलीस ठाण्यात घटनेची माहिती देण्यात आली. फिर्यादी ललीता कोडापे यांच्या तक्रारीहून भादंविच्या ३०२ भांदवि कलमान्वये नोंद करून वासुदेव इडपाचेला अटक करण्यात आली आहे. तपास पीएसआय म्हैसकर करीत आहे.

Web Title: Litter blood for the construction of toilets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Murderखून