लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पवनी तालुक्यातील मेंढेगाव शिवारातून चंद्रपूर जिल्ह्यातील शंकरपूर येथे चारचाकी वाहनाने दारूचा पुरवठा होत असल्याची गोपनीय माहिती पोलीस अधीक्षकांनी स्थापन केलेल्या रेड स्कॉड पथकाला मिळाली. त्यानंतर या पथकाने वाहनचालकाला पकडून कारवाई केली.उपनिरीक्षक आडोळे, फौजदार मेहर, हवालदार जांगळे, डाहारे, शिवनकर यांनी मेंढेगाव शिवार ते शंकरपूरकडे जाणारी एक पांढऱ्या रंगाची ताडपत्री झाकलेली चारचाकी क्रमांक (एमएच ४९ डी ६८३१) थांबवून वाहनाची पाहणी केली असता या वाहनात खरडयाचे देशी दारूने प्लास्टीक बाटलीत भरलेल्या २२० पेटया मिळून आल्या. ज्यामध्ये १०० पेटया व १२० पेटया प्रत्येक पेटीमध्ये ९० मिलीच्या देशी दारूने भरलेली १०० प्लॉस्टीक बॉटल प्रत्येकी बॉटल किंमती २६ रूपये याप्रमाणे असा ५ लाख ७२ हजाराची दारू आढळून आली. याबाबत परवाना विचारले असता कोणत्याही प्रकारचा परवाना सोबत आढळून आला नाही. त्यानंतर नमुने तपासणीकरीता एका पेटीतील ९० मिली देशी दारूने भरलेली प्लॉस्टीक बॉटल सिलबदं करण्यात आली. एक पांढऱ्या रंगाचे वाहनाची किंमत ६ लाख रूपये असा एकुण ११ लाख ७२ हजार रूपयाचा साठा आढळून आला. त्यानंतर वेगवेगळया जप्ती पत्रकाप्रमाणे जप्त करण्यात आले. आणि आरोपींना ताब्यात घेण्यात आले. या दोन्ही आरोपीना मुद्देमालाबाबत विचारपुस करून बयाण नोंदविण्यात आले. याशिवाय सदर देशी दारूच्या अवैध पेटया या शिवा अण्णा रा.नागपूर यांच्या सांगण्यावरून कारगाव शिवारात एका पांढऱ्या रंगाच्या वाहनातून दोन ईसमांनी २२० पेटया देशी दारू आरोपीच्या वाहनात भरले. हे वाहन शिवा अण्णाने भुयार, मेंढेगाव व काम्पामार्गे चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही, राजोली, मुल येथे नेण्यासाठी सांगितल्याचे आरोपींनी पोलिसांना सांगितले. यातील आरोपी व ईतर अज्ञात आरोपींनी संगनमत करून आणि कट रचुन देशी शासकीय परवाण्याचे उल्लघंन करून अवैधरित्या वाहतुक करताना आढळून आल्याप्रकरणी त्यांच्याविरूद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दारूबंदी जिल्ह्यात वाहतूक करणारे दारूचे वाहन पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 22:51 IST
पवनी तालुक्यातील मेंढेगाव शिवारातून चंद्रपूर जिल्ह्यातील शंकरपूर येथे चारचाकी वाहनाने दारूचा पुरवठा होत असल्याची गोपनीय माहिती पोलीस अधीक्षकांनी स्थापन केलेल्या रेड स्कॉड पथकाला मिळाली. त्यानंतर या पथकाने वाहनचालकाला पकडून कारवाई केली.
दारूबंदी जिल्ह्यात वाहतूक करणारे दारूचे वाहन पकडले
ठळक मुद्देमेंढेगाव येथील कारवाई : जिल्हा पोलिसांची कारवाई