साकोलीतील सेतू केंद्रात लिंक फेल
By Admin | Updated: August 29, 2015 00:54 IST2015-08-29T00:54:20+5:302015-08-29T00:54:20+5:30
येथील तहसील कार्यालयातील सेतू केंद्रावर लाभार्थ्यांचा रांगाच रांगा दिसून येतात.

साकोलीतील सेतू केंद्रात लिंक फेल
साकोली : येथील तहसील कार्यालयातील सेतू केंद्रावर लाभार्थ्यांचा रांगाच रांगा दिसून येतात. कामे सुरू होताच अर्ध्या तासानंतर येथील इंटरनेट सेवाच (लिंक) बंद होते. मात्र खाजगी महाआॅनलाईन सेतु केंद्रात मात्र इंटरनेट सेवा रात्रंदिवस सुरू राहते. त्यामुळे खासगी सेतू केंद्रवाल्याची तर हातमिळवणी नाही, अशी शंका व्यक्त करण्यात येत असून या खासगी सेतू केंद्रावर ग्राहकाकडून अधिकचे पैसे घेतले जात असल्याची चर्चा आहे.
शासनाने नागरिकांना तत्काळ प्रमाणपत्र मिळावे यासाठी महाआॅनलाईन प्रक्रिया सुरू केली. मात्र यात सर्वात मोठी अडचण आली ती इंटरनेटची. दर अर्ध्या तासाने लिंक फेल होते. त्यामुळे नागरिकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागते. मात्र याउलट साकोली येथील खाजगी महाआॅनलाईन सेतू केंद्रात मात्र दिवसभर इंटरनेट सेवा सुरू असते. सेतु केंद्रावरील वाढती गर्दी लक्षात घेता शासनाने शहरात खासगी महाआॅनलाईन सेतू केंद्राला परवानगी दिली. मात्र झाले उलट यामुळे तहसिल कार्यालयातील सेतू केंद्रावरील इंटरनेट सेवा दिवसभर विस्कळीत होऊ लागली व खासगी दिवसभर सुरू. या प्रकरणाची चौकशी करून नागरिकांची होणारी लुटमार थांबवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)