शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
13
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
14
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
15
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
16
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
17
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
18
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
20
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"

आधार बँक खात्याशी लिंक करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2020 6:00 AM

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत आधार लिंक नसणाऱ्या सभासदांची यादी सर्वच तहसील कार्यालयात प्रसिध्दीसाठी ...

ठळक मुद्देएम. जे. प्रदीपचंद्रन : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत आधार लिंक नसणाऱ्या सभासदांची यादी सर्वच तहसील कार्यालयात प्रसिध्दीसाठी सादर करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी यादीत आपले नाव असल्यास त्वरीत आधार कार्ड, बँक पासबुकचे पहिले पान, मोबाईल क्रमांक नजिकच्या बँक शाखा किंवा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेत सादर करुन आधार कार्ड बँकेशी लिंक करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन व जिल्हा उपनिबंधक मनोज देशकर यांनी केले आहे.महाराष्ट्र शासन निर्णय २७ डिसेंबर रोजीचे आदेशान्वये राज्यात महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. या शासन निर्णयान्वये योजनेचा तपशिल नमुद केलेला आहे.त्यानुसार या योजनेंतर्गत भंडारा जिल्ह्यातील ज्या शेतकºयांकडील १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ पर्यंत उचल केलेल्या एक किंवा एकापेक्षा जास्त ज्या कर्ज खात्यात न झालेली रक्कम दोन लाख रुपयांपर्यंत आहे, अशा शेतकºयांचे अल्प, अत्यल्प भुधारक या प्रमाणे जमीन धारणेचे क्षेत्र विचारात न घेता, त्यांच्या कर्ज खात्यात दोन लाख रुपयापर्यंत कर्जमुक्तीचा लाभ महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ या योजनेंतर्गत देण्यात येणार आहे.त्यानुषंगाने १ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली त्यांचे कार्यालयात तातडीची बैठक आयोजित करण्यात आली होती. बँकांनी संबंधित शेतकºयांचे आधार क्रमांक बँक खात्याशी तातडीने संलग्न करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिलेले होते.त्याप्रमाणे जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक यांनी जिल्ह्यातील बँकनिहाय सादर केलेल्या अहवालावरुन एकूण १,५६९ शेतकºयांनी अधार कार्ड बँकेत सादर केलेले नाहीत. त्यामुळे त्यांचे लिंकींग झालेले नाही. भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनी त्यांचे सभासद असलेल्या ३६८ विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांची तालुका निहाय आधार कार्ड सादर केलेल्या सभासदांची यादी घेतली असता सात तालुके मिळून एकूण ४१५७ शेतकरी सभासदांनी आधार कार्ड सादर केलेले नाही.अशा शेतकरी सभासदांची अ‍ॅनेक्चर-४ मध्ये बँकनिहाय, संस्थानिहाय व तालुकानिहाय यादी ग्रामपंचायत, चावडी, संस्था कार्यालय, बॅक शाखा येथे ७ जानेवारी रोजी प्रसिध्द करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करण्यात आली आहेत. सदर लाभार्थी शेतकºयांनी यादीत आपले नाव असल्यास त्वरीत आधार कार्ड, बँक पासबुकचे पहिले पान, मोबाईल नंबर, नजिकच्या बँक शाखेत द्यावे, असे प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे. 

टॅग्स :Adhar Cardआधार कार्ड