शिष्यवृत्तीची मर्यादा आता सहा लक्ष होणार
By Admin | Updated: July 31, 2016 00:30 IST2016-07-31T00:30:20+5:302016-07-31T00:30:20+5:30
राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने क्रिमिलीअरची मर्यादा ४.५० लक्ष वरून ६ लक्ष केली.

शिष्यवृत्तीची मर्यादा आता सहा लक्ष होणार
मर्यादा वाढली : काशीवार यांची माहिती
साकोली : राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने क्रिमिलीअरची मर्यादा ४.५० लक्ष वरून ६ लक्ष केली. परंतु ६ लक्ष उत्पन्न असलेल्या पालकांचया पाल्यांना शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्तीची मर्यादा साडेचार लक्षच होती. त्यामुळे शिक्षण शुल्काच्या म्हजेच शिष्यवृत्तीच्या प्रतिपूर्तीमध्ये वाढ न केल्यामुळे पालकांना आपल्या पाल्यांना अभियांत्रिकी किंवा तत्सम शिक्षणासाठी फ्रिशीपमध्ये प्रवेश मिळणे अडचणीचे झाले होते.
त्यामुळे भविष्यात लागणाऱ्या वेतन आयोगामुळे वाढणारे वेतन लक्षात घेता शिष्यवृत्तीच्या मर्यादेत वाढ करण्यासाठी आ.बाळा काशीवार यांनी तारांकीत प्रश्न आणि लक्षवेधीच्या माध्यमातून शासनाचे वारंवार लक्ष वेधणे, त्या अनुषंगाने शासनाने या विषयावर वित्त विभागाशी चर्चा करून साडेचार लक्ष रुपयांच्या मर्यादेत वाढ करून सहा लक्ष करण्याचे ठरविले आहे. यासंबंधी लवकरच मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय होणार आहे. यासाठी आमदार बाळा काशीवार यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मोलाचे सहकार्य केले. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. (तालुका प्रतिनिधी)
आरोग्यास धोका
साकोली : रस्त्यालगत खाद्य पदार्थांच्या स्टॉलवर, हॉटेलमध्ये अस्वच्छता असते. पाणीही शुद्ध मिळत नाही. मात्र त्यांची तपासणी कोणी करीत नाही. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. (तालुका प्रतिनिधी)
सहकार्य अपेक्षित -आ. काशीवार
लोकांनी माझ्यावर व पक्षावर विश्वास ठेवून साकोली विधानसभा क्षेत्राचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी दिली. या संधीचे मी सोने करून जनतेच्या हितासाठी शेवटपर्यंत लढेन. मात्र यासाठी जनतेने संयम बाळगून सहकार्य करावे अशी अपेक्षा आ.काशीवार यांनी व्यक्त केली.