लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : मनसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याशेजारी खापा-देव्हाडी शिवारात एका मालवाहू ट्रकने विद्युत खांबाला धडक दिली. या धडकेत तीन वीज खांब तुटून पडले. रस्त्यावरील खांब आडवा झाला. वीज तारांचा गुंता झाला. वाहनचालकांनी प्रसंगावधान बाळगून वाहने सुरक्षित ठिकाणी उभी केली. वीज वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तात्काळ दखल घेऊन मध्यरात्री रस्ता मोकळा केला. सदर घटना सोमवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास घडली.सध्या मनसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु आहे. सदर प्रकार देव्हाडी - खापा शिवारात घडला. रस्ता रुंदीकरणात वीज खांब रस्त्याच्या मधोमध आला होता. रिफ्लेक्टर तथा इतर सुरक्षेततेसंदर्भात सुविधा नाही.सीमेंट खांब असल्याने तो उखडून रस्त्यावर पडला. त्यासोबत इतर दोन वीज खांब वाकले. वीज तारा भर रस्त्यावर लोंबकळत होत्या. तर काही तारांचा रस्त्यावर गुंता झाला. त्यामुळे रात्री रस्त्यावर दुतर्फा वाहतूक रखडून वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. वीज तारांमुळे मोठा अनर्थ टळला. स्थानिकांनी या अपघाताची माहिती वीज वितरण कंपनीच्या अधिकाºयांना दिली. अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. रस्त्याशेजारी भराव न घातलयने दोन्ही बाजूंना खड्डे आहेत. सुरक्षेच्या उपाययोजना नगण्य आहे.
वीज खांबाला ट्रकची धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 22:10 IST
मनसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याशेजारी खापा-देव्हाडी शिवारात एका मालवाहू ट्रकने विद्युत खांबाला धडक दिली. या धडकेत तीन वीज खांब तुटून पडले. रस्त्यावरील खांब आडवा झाला. वीज तारांचा गुंता झाला. वाहनचालकांनी प्रसंगावधान बाळगून वाहने सुरक्षित ठिकाणी उभी केली.
वीज खांबाला ट्रकची धडक
ठळक मुद्देमहामार्गावरील प्रकार : वीज तारा तुटल्या, सुदैवाने जिवीत हानी टळली