डोंग्यावर वीज कोसळली

By Admin | Updated: August 21, 2015 00:09 IST2015-08-21T00:09:49+5:302015-08-21T00:09:49+5:30

नागपंचमीच्या दिवशी गोसीखुर्द प्रकल्पांतंर्गत नदीपात्रात मासेमारी करणाऱ्या डोंग्यावर वीज कोसळून एक जण ठार तर एक जखमी झाला.

Lightning on the hill collapsed | डोंग्यावर वीज कोसळली

डोंग्यावर वीज कोसळली

एक ठार, एक जखमी : पाथरी येथील घटना, मासे पकडताना घडली घटना
चिचाळ : नागपंचमीच्या दिवशी गोसीखुर्द प्रकल्पांतंर्गत नदीपात्रात मासेमारी करणाऱ्या डोंग्यावर वीज कोसळून एक जण ठार तर एक जखमी झाला. पुरुषोत्तम श्रीराम मारबते (४३) असे मृताचे नाव आहे. विलास मेश्राम (३५) असे जखमीचे नाव आहे.
गोसीखुर्द इंदिरा सागर प्रकल्पांतर्गत वैनगंगा नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर ढिवर समाज बांधवांची उपजिविका आहे. काल (१९ आॅगस्ट) बुधवारला सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास पाथरी येथील पुरुषोत्तम श्रीराम मारबते व त्यांचा मावसभाऊ विलास महादेव मेश्राम हे प्रकल्पस्थळी मासे मारेसाठी गेले होते. यावेळी मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. यादरम्यान डोंग्यावर वीज कोसळली. दोघेही पाण्यात कोसळले. पुरुषोत्तम यांचा जागीच मृत्यू झाला तर विलास हे जखमी झाले. जखमी अवस्थेतही विलासने पुरुषोत्तमला डोंग्यावर मांडून बाहेर काढले. पुरुषोत्तम यांच्यावर बँकेचे २० हजार रुपये व गावातील हात ऊसनवारी असे एकूण ५० हजार रुपयांचे कर्ज असल्याची माहिती आहे. पुरुषोत्तम यांच्या मागे पत्नी, दोन मुले आहेत. घरचा कर्ता पुरुष गेल्याने मारबते कुटुंबियांवर दु:खाचे डोंगर कोसळले आहे. शासनाने ५ लाख रुपयांची मदत करावी अशी मागणी होत आहे. घटनास्थळाला जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेश डोंगरे, तहसीलदार नरेंद्र राचेलवार, मंडळ अधिकारी आर.व्ही. मडावी, तलाठी एस.आर. इंगळ, अड्याळ येथील पोलीस निरीक्षक अजाबराव नेवारे यांनी भेट दिली. बीट जमादार सहाय्यक फौजदार अनिल नंदेश्वर यांनी पंचनामा केला. (वार्ताहर)

Web Title: Lightning on the hill collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.