वीज पडून घर कोसळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 22:51 IST2017-10-09T22:51:30+5:302017-10-09T22:51:45+5:30
येथे सोमवारी आलेल्या मुसळधार पावसादरम्यान विजेचा कडकडाट झाला.

वीज पडून घर कोसळले
ठळक मुद्देअड्याळ येथील घटना : म्हातारी बालंबाल बचावली
लोकमत न्यूज नेटवर्क
अड्याळ : येथे सोमवारी आलेल्या मुसळधार पावसादरम्यान विजेचा कडकडाट झाला. यातच प्रभावती वंजारी रा.अड्याळ यांच्या घरावर वीज कोसळली. यात त्या बालंबाल बचावल्या.
मागील दोन दिवसांपासून येणाºया पावसामुळे धान पिकाची नुकसान झाले. वीज कोसळल्याने घरच पडले. घरातील कुणालाही काही झाले नाही. घरावर कोसळताच घराच्या शेजारील महिला पुरूषांनी त्या घराकडे धाव घेऊन आधी घरातील व्यक्तीला बाहेर काढले व कोणालाही काहीच झाले नाही. यात घराचे अंदाजन १ ते २ लाखाचे नुकसान झाल्याचे कळते.