वीज कोसळली, घर जळून खाक
By Admin | Updated: March 2, 2016 01:18 IST2016-03-02T01:18:17+5:302016-03-02T01:18:17+5:30
तालुक्यातील पिंपळगाव को. येथील माणिक जगन परशुरामकर यांच्या घरावर वीज पडून १०० क्विंटल जयश्रीराम धान्यासह ..

वीज कोसळली, घर जळून खाक
पिंपळगाव येथील घटना : पाच जण जखमी, पाच लाखांचे नुकसान
लाखांदूर : तालुक्यातील पिंपळगाव को. येथील माणिक जगन परशुरामकर यांच्या घरावर वीज पडून १०० क्विंटल जयश्रीराम धान्यासह इतर सामान जळाल्याने जवळपास पाच लाखाचे नुकसान झाल्याची घटना काल सायंकाळी ५ वाजता घडली. आग विझविताना पाच जण जखमी झाले.
दोन दिवसापासून वादळ व पावसाचा जोर तालुक्यात दिसून येत आहे. मात्र दि. २९ फरवरीला जोरदार वादळ व पावसाने धुमाकूळ घातला. सायंकाळी ५ वाजताचे सुमारास जोरदार विजांचा कडकडाटासह पाऊस सुरु झाला. यावेळी पिंपळगाव को. येथील माणिक जगन परशुरामकर यांचे घरावर वीज पडली. अन् बघता बघता संपूर्ण घर आगीने पेट घेतला. या घरामध्ये संपूर्ण शेतमाल तुळ ३ क्विंटल, जय श्रीराम वाणाचे धान १०० क्विंटल जनावरांचा चारा, फाटे, कवेलू संपूर्ण राख रांगोळी झाली. आग दिसताच संपूर्ण गावकरी मिळेल त्या साधनाने आग विझविण्यासाठी धावले. आगीचे लोळ जास्त असल्याने आता वितांना प्रकाश परशुरामकर, भास्कर परशुरामकर, देवा परशुरामकर, मनोहर गेडाम, रोशन धाकडे हे जखमी झाले. लवकरच आग आटोक्यात आली. मात्र तोपर्यंत घरातील सामानाचे व घराचे मोठे नुकसान झाले. तहसीलदार विजय पवार देवीदास भोयर सरपंच परशुरामकर यांनी घटनास्थळाला भेट देवून पंचनामा केला. यावेळी जि.प. सदस्य रमेश डोंगरे यांनी भेट देऊन घरमालकाला जास्तीत जास्त अर्थसहाय्य देण्याची मागणी केली. (तालुका प्रतिनिधी)