पावसाने हलके धान भुईसपाट

By Admin | Updated: October 10, 2016 00:27 IST2016-10-10T00:27:27+5:302016-10-10T00:27:27+5:30

मागील काही दिवसांपासून दररोज दमदार हजेरी लावणाऱ्या पावसाने कापणीयोग्य हलके धान भुईसपाट झाले आहेत.

Light rainy ground floor rains | पावसाने हलके धान भुईसपाट

पावसाने हलके धान भुईसपाट

भारी धानालाही फटका : कडपांमध्ये शिरले पाणी
विरली (बु.) : मागील काही दिवसांपासून दररोज दमदार हजेरी लावणाऱ्या पावसाने कापणीयोग्य हलके धान भुईसपाट झाले आहेत. सततच्या पावसामुळे भारी धानही शेतात लोटल्यामुळे या धानालाही फटका बसण्याची शक्यता आहे. परिणामी लाखांदूर तालुक्यात ओल्या दुष्काळाचे सावट पसरले आहे.
यावर्षी खरीप हंगामाच्या सुरुवातीला पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावली, शेतकऱ्यांचे रोवणे आटोपले. त्यानंतर पावसाने दिर्घकाळ दडी मारुन डोळे वटारले. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले धानपिक वाचविण्यासाठी जीवाचा आटापीटा करुन जमेल त्या पध्दतीने आपल्या धानशेतीला पाणीपुरवठा केला. आता गरज नसतांना बरसणाऱ्या पावसाने डोळ्यात पाणी आणले आहे.
या परिसरात मोठ्या प्रमाणात हलक्या धानाची लागवड असून सद्यास्थितीत हे धान परिपक्व झाले आहेत. मात्र गेल्या १५ ते २० दिवसांपासून दररोज हजेरी लावणाऱ्या पावसाने परिपक्व झालेले धान शेतात भुईसपाट झाले असून शेतात साचलेल्या पाण्यामुळे हे धान अंकुरण्याच्या मार्गावर आहेत. काही शेतकऱ्यांनी कडपा पाण्यावर कापणी केली त्याच्या तरंगु लागल्या असून हे धान मातीमोल होत आहेत. दररोजच्या पावसाने शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आणले असून शेतशिवारात चोहिकडे पाणीच पाणी असल्यामुळे हलक्या धान शेतीतील पाणी काढणे दुरापास्त झाले आहेत. परिणामी आता धान वाचविण्यासाठी शेतातील पाणी कसे काढावे या विंवचनेत शेतकरी सापडला आहे.
सततच्या पावसामुळे सध्या गर्भावस्थेत असलेले भारी धानही शेतात झोपले असून या धानालाही फटका बसण्याची शक्यता आहे. सद्यास्थितीत दररोज हजेरी लावणाऱ्या पावसाने शेतकऱ्यांचे तोंडचा घास हिरावून घेतला असून लाखांदूर तालुक्यावर ओल्या दुष्काळाचे सावट पसरले आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी लाखांदूर तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी केली आहे. (वार्ताहर)

Web Title: Light rainy ground floor rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.