सुखदेवे विद्यालयात जीवन कौशल्य उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:36 IST2021-04-07T04:36:00+5:302021-04-07T04:36:00+5:30
भंडारा : तालुक्यातील फुलमोगरा स्थित माणिकराव सुखदेवे विद्यालयात जीवन कौशल्य कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सुनील घोल्लर ...

सुखदेवे विद्यालयात जीवन कौशल्य उपक्रम
भंडारा : तालुक्यातील फुलमोगरा स्थित माणिकराव सुखदेवे विद्यालयात जीवन कौशल्य कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सुनील घोल्लर होते. प्रमुख अतिथी म्हणून गजानन लिचडे होते. मार्गदर्शक अधिकारी मेहरू मीना शेख या उपस्थित होत्या. मॅजिक बस इंडियामार्फत विद्यालयात जीवन कौशल्यअंतर्गत पाच सत्र घेण्यात आली. यात मानसिक कल्याण, सकारात्मक व नकारात्मक, कोविड-१९च्या नियमांचे पालन करणे, आरोग्य, बालकांचे अधिकार व लिंग भाव समानता इत्यादींचे मार्गदर्शन मार्गदर्शक मेहरू मीना शेख यांनी केले. याप्रसंगी संस्थेचे सचिव अनंत डुम्भरे, प्रकाश चौधरी ,ईश्वरदास लाखडे, श्रावण चव्हाण, प्रतिभा जिभकाटे, अनुराधा हुमणे, जयश्री घोल्लर, चंद्रशेखर डुम्भरे, राजेश मेश्राम, देवा वाट, धनंजय सेलोकर उपस्थित होते.