भंडारा जिल्ह्यात विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवनदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 15:38 IST2020-05-19T15:38:31+5:302020-05-19T15:38:54+5:30
भंडारा वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या कोका वन्यजीव अभयारण्याला लागू असलेल्या चितापूर गाव शिवारातील विहिरीत बिबट आढळला. शेतमालक अभिमान कुसराम यांनी याची माहिती भंडारा वनविभागाला दिली. वनाधिकाऱ्यांच्या ताफा घटनास्थळी दाखल होत विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढून त्याला जीवनदान दिले.

भंडारा जिल्ह्यात विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवनदान
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : भंडारा वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या कोका वन्यजीव अभयारण्याला लागू असलेल्या चितापूर गाव शिवारातील विहिरीत बिबट आढळला. शेतमालक अभिमान कुसराम यांनी याची माहिती भंडारा वनविभागाला दिली. वनाधिकाऱ्यांच्या ताफा घटनास्थळी दाखल होत विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढून त्याला जीवनदान दिले.
शेतकरी कुसराम सकाळच्या सुमारास शेतात आल्यानंतर त्यांना विहिरीत बिबट दिसला. याची माहिती भंडारा येथील बचाव पथकाला देण्यात आली. सकाळी ११ वाजताच्या सुमारास या बिबट्याला बाहेर काढण्यात आले. त्याला गडेगाव डेपोत ठेवण्यात आले असून त्याची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली. सदर कारवाई भंडारा वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक राजूरकर यांच्या पथकाने केली. वृत्त लिहिपर्यंत त्याला जंगलात सोडण्याबाबत निर्णय घेण्यात आला नव्हता.