ग्रंथालय पुरस्कारांचे निकष बदलले
By Admin | Updated: September 26, 2015 00:34 IST2015-09-26T00:34:16+5:302015-09-26T00:34:16+5:30
ग्रंथालयीन क्षेत्रात देण्यात येणारे उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय आणि उत्कृष्ट ग्रंथालय 'सेवक' उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता या पुरस्कारांच्या अटी शर्तीमध्ये बदल करण्यात आला आहे.

ग्रंथालय पुरस्कारांचे निकष बदलले
भंडारा : ग्रंथालयीन क्षेत्रात देण्यात येणारे उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय आणि उत्कृष्ट ग्रंथालय 'सेवक' उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता या पुरस्कारांच्या अटी शर्तीमध्ये बदल करण्यात आला आहे. यापुढे १0 वर्षांतून एकदाच हे पुरस्कार दिले जाणार आहेत. उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय, उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता, उत्कृष्ट ग्रंथालय सेवक हे पुरस्कार मिळविण्यासाठी आता ५0 टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. यासोबतच पुरस्कार मिळविणाऱ्यांचा पुढील १0 वर्षे या पुरस्कारासाठी विचार केला जाणार नसल्याबाबत उच्च तंत्रशिक्षण मंत्रालयाने निर्णय घेतला आहे.
ग्रंथालय चळवळीत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रंथालयांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्वोत्कृष्ट ग्रंथालयासह उत्कृष्ट काम करणाऱ्यांना ग्रंथालय सेवक कार्यकर्त्यांनाही पुरस्कार दिला जातो. त्यामध्ये अनुक्रमे डॉ. एस.आर. रंगनाथन उत्कृष्ट कार्यकर्ता सेवक ग्रंथमीत्र पुरस्काराचा समावेश आहे. मात्र, या पुरस्काराबाबतचे निकष अटी शर्ती निवड प्रक्रिया निश्चित करुन सुधारीत निर्णय घेण्यात आला आहे. अटी शर्ती गुणवत्तेच्या निकषांची पूर्तता करणाऱ्या आणि किमान ५0 टक्के गुण मिळविणारी सार्वजनिक ग्रंथालये, सेवक कार्यकर्त्यांना या पुरस्कारांसाठी पात्र ठरविण्यात येणार आहे.
ग्रंथालय सेवक कार्यकर्त्यांचे ज्या वर्षी अर्ज नसतील त्यावर्षी संबंधित पुरस्कार दिला जाणार नाही. दरम्यान या पुरस्कारांमुळे ग्रंथालयास प्रोत्साहन मिळते. यासह अधिकाधिक कार्यकर्ते तयार होऊन चळवळ वाढविण्यास मदत होत होती. या निर्णयाचा ग्रंथालयांवर परिणाम होऊ शकतो. पुरस्काराच्या वर्षात तफावत आल्याने कार्यकर्त्यांमध्ये निरूत्साहाचे वातावरण आहे. (शहर प्रतिनिधी)