जनतेचे सेवक बनून काम करू
By Admin | Updated: August 29, 2016 00:28 IST2016-08-29T00:28:56+5:302016-08-29T00:28:56+5:30
चारभट्टी येथे आयोजित संमेलन हे ईश्वरीय भक्तीचा सागर असून येथे मनुष्य घडविण्याचे काम होते.

जनतेचे सेवक बनून काम करू
चारभट्टी येथे कार्यक्रम : नाना पटोले यांचे प्रतिपादन, भाविकांनी घेतला महाप्रसादाचा आस्वाद
लाखांदूर : चारभट्टी येथे आयोजित संमेलन हे ईश्वरीय भक्तीचा सागर असून येथे मनुष्य घडविण्याचे काम होते. लोकप्रतिनिधी म्हणून काम करीत असताना आम्ही जनतेचे सेवक आहोत, सेवक बनूनच काम करू, असे प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी यांनी व्यक्त केले. लाखांदूर तालुक्यातील चारभट्टी (पुयार) येथील जागृत हनुमान मंदिरात आयोजित हनुमान चालीसा आणि महाप्रसाद कार्यक्रमात बोलत होते.
खासदार नाना पटोले मित्र परिवाराच्या वतीने दरवर्षी येथे हनुमान चालीसा आणि महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केल्या जाते. यंदाही श्रावण समाप्तीच्या शेवटच्या शनिवारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी गोंदिया येथील सोनी यांनी हनुमान चालीसा गायन करून हजारो भक्तांना मंत्रमुग्ध केले. हनुमान चालीसानंतर समारोपीय कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली.
यावेळी मंचावर खासदार नाना पटोले, आमदार बाळा काशिवार, तिरोड्याचे आमदार विजय रहांगडाले, स्वामी दिनेशानंदजी, मोझरी येथील गुरूदेव सेवा मंडळाचे सर्वाधिकारी वाघ महाराज, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी विनोद पटोले, लाखांदूरच्या नगराध्यक्षा नीलम हुमणे, नगरपंचायतचे उपाध्यक्ष नरेश खरकाटे, प्रमोद लांजेवार, सविता ब्राम्हणकर, नगरसेवक हरीश बगमारे, प्रल्हाद देशमुख, नूतन कांबळे, गोपीचंद भेंडारकर, राम पुरोहित, पारधी महाराज, सुनील तेलंग उपस्थित होते.
यावेळी पटोले म्हणाले, संमेलनाच्या माध्यमातून राज्य तथा केंद्र सरकारने केलेल्या विकास कामांची माहिती देणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतले आहे, अशा सर्व शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळणार असून भंडारा जिल्ह्यातील ५५ हजार आणि गोंदिया जिल्ह्यातील ३५ हजार शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ होणार आहे. पीक विम्यासंदर्भात गैरसमजुती असल्याने यावर्षी अनेक शेतकरी पीक विम्याच्या लाभापासून वंचित राहणार आहेत. ज्यांनी पीक कर्ज घेतले आहेत अशांनी तालुका कृषी अधिकाऱ्याकडे कृषी सहायकाच्या माध्यमातून अर्ज सादर करावे जेणेकरून पीक विम्याचा लाभ देण्यासाठी सोईस्कर होईल.
मोझरीचे प्रकाश वाघ महाराज यांनी ‘जिससे प्यारा कोई मैने देखा नाही, सारी दुनिया घुमा, सारी दुनिया घुमा’ या राष्ट्रसंताच्या भजनाने उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाला आशिक चांडक, नवीन नशीने, राजू पालीवाल, संजय जयस्वाल, मनोज चुटे, बाळू फुंडे, वासुदेव मुरकुटे, सविता ब्राम्हणकर, नूतन कांबळे, उपाध्यक्ष नरेश खरकाटे, महामंत्री भरत खंडाईत, नीलम हुमणे, मंगेश वंजारी, शिवा गायधने, राजेश कोटेवार, रज्जू पठाण, रामचंद्र राऊत, मेहबूब पठाण, सुरज घरडे, सुभाष खिल्वानी, भास्कर झोडे, बाळू बडवाईक, हरिभाऊ रुखमोडे, शिवाजी देशकर, जि.प. सदस्य मनोहर राऊत, बाजार समितीचे मुख्य प्रशासक वामन बेदरे, अल्का मेश्राम, उमेश भेंडारकर, लालू करंजेकर, रवी गौरकर यांच्यासह भाविक उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)