कार्यशाळांतून विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करू

By Admin | Updated: July 17, 2016 00:27 IST2016-07-17T00:27:59+5:302016-07-17T00:27:59+5:30

विद्यार्थी हिताचे कार्य करणे गरजेचे आहे. १५ आॅगस्टपासून राज्य पातळीवर भारतरत्न राजीव गांधी बुक बँक उपक्रम राबवून गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्यात येणार असून

Let's train the students through workshops | कार्यशाळांतून विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करू

कार्यशाळांतून विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करू

एनएसयुआयची बैठक : करिश्मा ठाकूर यांचे प्रतिपादन
भंडारा : विद्यार्थी हिताचे कार्य करणे गरजेचे आहे. १५ आॅगस्टपासून राज्य पातळीवर भारतरत्न राजीव गांधी बुक बँक उपक्रम राबवून गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्यात येणार असून विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन करुन त्यांना प्रशिक्षीत करण्यात येणार आहे. त्यांची शैक्षणिक, सामाजिक प्रगती साधण्यासाठी कार्य केले जाणार आहे, असे प्रतिपादन एनएसयुआयच्या राष्ट्रीय सचिव तथा प्रदेश एनएसयुआय निरीक्षक करिश्मा ठाकूर यांनी केले.
भंडारा जिल्हा एनएसयुआयची शुक्रवारी आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीला कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणविर, जिल्हा परिषद सदस्य प्यारेलाल वाघमारे, एनएसयुआयचे आशिष मंडपे, प्रदेश उपाध्यक्ष रोशनलाल बिट्टू, सचिव अभिषेक सिंह उपस्थित होते.
बैठकीत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, त्यांचे हक्क, समस्या, विविध योजना, कार्यशाळा एनएसयुआय संघटनेचे कार्य यावर चर्चा करण्यात आली. प्रास्ताविक एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष भुषण टेंभुर्णे यांनी केले.
यावेळी जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणविर म्हणाले, विद्यार्थी दशेपासुनच समाजसेवा केली पाहिजे. माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांनी मिळवून दिलेल्या वयाच्या १८ वर्षात मतदानाचा अधिकार प्राप्त झाल्याने १९ व्या वर्षी नगरसेवक बनु शकलो. पक्षासोबत एकनिष्ठ राहुन समुहाने कार्य केल्याने प्रगती साधु शकतो. एनएसयुआयचे कार्य उत्तम असुन आपण सर्वतोपरी सहकार्य करणार आहे. संघटनेला मजबुत करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या बैठकीत विजय गिऱ्हेपुंजे, प्रणय थोटे, शुभम वैद्य कोदामेंडी, संजय नागोसे, कार्तिक कडव, तुषार भुरे, चैतन्य बागडे, निखील पत्र, शुभम जिभकाटे, सचिन नंदनवार, लिलाधर हलमारे यांनी एनएसयुआय संघटनेत प्रवेश केला.
कार्यक्रमाला अल्पसंख्यंक सेलचे जिल्हाध्यक्ष अनिक जमा पटेल, सुनिल बन्सोड, मुकूंद साखरकर, हेमंत मलेवार, प्रशांत पारखेडकर, प्रणय थोटे, लक्ष्मण कटरे, विवेक गायधेन, सागर भुरे, व्यंकटेश पाथरे, अविनाश नंदेश्वर, श्याम भालेराव, नागदेवे, विपुल रायक्वाड, राजेश तांबोरकर, शुभम वैद्य भंडारा, प्रशांत परखेडकर, कार्तिक कडव, संजय नागोसे, विलास उपरीकर उपस्थित होते. संचालन हेमंत मलेवार यांनी तर आभारप्रदर्शन पवन वंजारी यांनी केले. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Let's train the students through workshops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.