विद्यार्थ्यांना प्राचीन दृष्टिकोन पटवून द्या
By Admin | Updated: September 2, 2014 23:32 IST2014-09-02T23:32:11+5:302014-09-02T23:32:11+5:30
इयत्ता तिसरी व चवथीसाठी २०१४-१५ या वर्षात लागू झालेला संपूर्ण अभ्यासक्रम, त्याची उद्दीष्टे व पाठ्यपुस्तके यावर मुक्तचिंतन करण्याचा अधिकार प्राथमिक शिक्षकांना आहे. गणिताची देणगी भारताने

विद्यार्थ्यांना प्राचीन दृष्टिकोन पटवून द्या
पुनर्रचित पाठ्यक्रमाची समीक्षा : उल्हास फडके यांचे प्रतिपादन
ंभंडार : इयत्ता तिसरी व चवथीसाठी २०१४-१५ या वर्षात लागू झालेला संपूर्ण अभ्यासक्रम, त्याची उद्दीष्टे व पाठ्यपुस्तके यावर मुक्तचिंतन करण्याचा अधिकार प्राथमिक शिक्षकांना आहे. गणिताची देणगी भारताने जगाला दिली आहे. संख्याज्ञान आणि दशमानपद्धती या गणिताच्या बाबी भारतीयांनी जगाला दिल्या आहेत. हे आवर्जून विद्यार्थ्यांना सांगावे लागेल, आर्यभट्ट, वराहमिहीर भास्कराचार्य हे आम्ही विद्यार्थ्यांना शिकवले पाहिजे, असे मार्गदर्शन डॉ.उल्हास फडके यांनी व्यक्त केले.
भारतीय शिक्षण मंडळाच्या भंडारा शाखेतर्फे नुकतेच स्थानिक महिला समाज प्राथमिक शाळेत आयोजित इयत्ता तिसरी व चवथीच्या पुनर्रचित पाठ्यक्रमाची समीक्षा या चर्चात्मक कार्यक्रमात ते बोलत होते. तिसरी व चवथीचा पुनर्रचित अभ्यासक्रम बालकांच्या व्यक्तीमत्व विकासाच्या दृष्टीने कितपत योग्य आहे, अभ्यासक्रमात राष्ट्रीय दृष्टीकोन कितपत आहे, कोणते पाठ्यांश राष्ट्रहिताच्या दृष्टीने योग्य नाहीत, मुल्यसंस्कारासाठी कोणत्या गोष्टी अभ्यासक्रमात जोडता येऊ शकतील. या चार मुद्यांवर चर्चासत्रात समीक्षा करण्यात आली.
चर्चासत्रात पा.वा. नवीन मुलींची शाळा, संत शिवराम प्राथमिक शाळा, महिला समाज प्राथमिक शाळा, उज्वल प्रा. शाळा, अंकुर विद्या मंदीर, प्राईड कॉन्व्हेंट, पंचशील प्रा. शाळा सेंट पॉल प्रा. शाळा या शाळांच्या एकूण ४५ शिक्षक-शिक्षिका उपस्थित होत्या. संत शिवराम शाळेच्या कुसूम सार्वे, आचरे महिला समाजच्या मुकेवार, उज्वल प्रा. शाळेच्या पांढारकर अंकुर विद्या मंदीरच्या डॉली चौलेरा, प्राईड कॉन्व्हेंटच्या प्राची मोहतुरे, पार्वताबाई वाठोडकर नवीन मुलींच्या शाळेच्या मुख्याध्यापिका पांडे यांनी पाठ्यक्रमाबाबत मते व्यक्त केली.
माधुरी मुकेवार यांनी पाठ्यक्रमात भारतीय इतिहासाचा अभाव असल्याचे सांगितले. प्रास्ताविक माधुरी मुळे यांनी केले तर संचालन अपर्णा उमाळकर यांनी तर आभार देहाडराय यांनी केले. (प्रतिनिधी)