विद्यार्थ्यांनी घेतले पर्यावरण स्नेही गणेशमूर्ती बनविण्याचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 22:56 IST2018-09-14T22:56:07+5:302018-09-14T22:56:46+5:30

येथील ग्रीनफ्रेंडस नेचर क्लब लाखनी व अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मुलन समिती तालुका लाखनी तर्फे ‘पर्यावरण स्नेही गणेशमुर्ती बनवा’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

The lessons learned from making students an environment friendly song of Ganesh idol | विद्यार्थ्यांनी घेतले पर्यावरण स्नेही गणेशमूर्ती बनविण्याचे धडे

विद्यार्थ्यांनी घेतले पर्यावरण स्नेही गणेशमूर्ती बनविण्याचे धडे

ठळक मुद्देग्रीनफ्रेंडस व अंनिसचे आयोजन : गणेशोत्सवात मिरवणुकीमध्ये होणाऱ्या दुष्परिणामाची जाणून घेतली माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : येथील ग्रीनफ्रेंडस नेचर क्लब लाखनी व अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मुलन समिती तालुका लाखनी तर्फे ‘पर्यावरण स्नेही गणेशमुर्ती बनवा’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
गणेशोत्सवानिमित्त होणारे ध्वनी व जल प्रदुषण टाळण्याकरीता व पर्यावरणपुरक गणेशोत्सवाचा संदेश सर्वत्र पसरण्याच्या दृष्टीने ग्रीनफ्रेंडस नेचर क्लबचे संघटक व अ.भा. अंनिस चे जिल्हा कार्याध्यक्ष तसेच लाखनी तालुका संघटक प्रा. अशोक गायधने यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना व कार्यकर्त्यांना आईलपेंट, तसेच प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या मुर्तीमुळे त्याचबरोबर निर्माल्यामुळे होणारे जलप्रदुषण व त्याद्वारे जलसाखळीला होणारे धोके यावर इत्यंभुत माहिती दिली. तसेच १० दिवसाच्या गणेशोत्सवात मिरवणुकीमध्ये होणारे ध्वनीप्रदुषण तसेच सजावटीमध्ये होणारे प्लॅस्टिक, थर्माकोलच्या दुष्परिणामांविषयी माहिती दिली. यावेळी ग्रीनफें्रडस नेचर क्लबचे तसेच अ.भा.आं.नि.स. तालुका पदाधिकारी अशोक वैद्य, सेवानिवृत्त कलाशिक्षक दिनकर कालेजवार, सिध्दार्थ विद्यालय सावरीचे हरितसेना शिक्षक दिलीप भैसारे यांनी इकोफ्रेंडली गणेशमुर्ती पर्यावरण देखावा व संदेशासहित कशी तयार करावी याबद्दल प्रशिक्षण दिले.
तसेच सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना ‘एग गांव-एक गणपती’ या धोरणाचा प्रचार करण्याचे आवाहन केले. यानंतर विद्यार्थ्यांनी चार-पाच दिवसातच मातीपासुन तयार केलेल्या व पर्यावरण देखावा सहित गणेश मूर्ती सादर केल्या. सिध्दार्थ विद्यालय सावरी विद्यालयामधून मिडलस्कुल गटात प्रथम क्रमांक ओंकार मंगल चाचेरे याला प्राप्त झाला. द्वितीय क्रमांक पंकज रविंद्र देशमुख याला प्राप्त झाला. हायस्कुल गटामधून प्रथम क्रमांक ऋचिता निलकंठ गायधनी व गजानन शत्रुघ्न गायधनी यांना प्राप्त झाला. द्वितीय क्रमांक प्रतिक दत्तराज राऊ त याला प्राप्त झाला. राणी लक्ष्मी कन्या विद्यालयातून प्रथम क्रमांक प्राजंली राजेश उईके हिला प्राप्त झाला. द्वितीय क्रमांक गायत्री रमेश वैद्य हिला तर तृतीय क्रमांक मनस्वी बाळकृष्ण गभने हिला प्राप्त झाला.
समर्थ विद्यालयामधून मिडलस्कुल गटात प्रथम क्रमांक रोहन सुखदेव मांढरे याला तर हायस्कुल गटातून प्रथम क्रमांक वज्रेश गिरिधर मेश्राम याला तर द्वितीय क्रमांक भुषण राजेश धांडे यांना प्राप्त झाला. एम.डी.एम. फ्युचर स्कुल लाखनीचा अर्णव गायधने तसेच पोदार इंटरनॅशनल स्कुल भंडाराचा अथर्व गायधने यांना प्रथम क्रमांक प्राप्त झाला.
ग्रीनफ्रेंडसचे पदाधिकारी पंकज भिवगडे, तुषार दळवी, श्रृती राऊ त, हरित सेना शिक्षक सिध्दार्थ विद्यालयाचे दिलीप भैसारे व प्रा. अशोक गायधने यांनी सुबक सुंदर पर्यावरण देखावा सहित असलेल्या गणेश मुर्त्याचे निरिक्षण केले.
पर्यावरण स्नेही गणेशमुर्ती उपक्रमाला यशस्वी करण्याकरिता निसर्गमित्र पंकज भिवगडे, तुषार दळवी, सिध्दार्थ विद्यालयाचे प्राचार्य धनंजय तिरपुडे, हरित सेना शिक्षक दिलीप भैसारे, राणी लक्ष्मी कन्या विद्यालयाचे मुख्याध्यापिका संध्या हेमणे, हरित सेना शिक्षिका निधी खेडीकर, समर्थ विद्यालयाचे प्राचार्य दा.ई. प्रधान, हरित सेना शिक्षक अनिल बडवाईक, ग्रीनफ्रेंडस व अभाअंनिसचे तालुका पदाधिकारी नामदेव कान्हेकर, वसंता खराबे, मारोतराव कावळे, योगेश वंजारी, नितिन पटले, पंकज कावळे, अंश जांभुळकर, राहुल मेश्राम, प्राची मेश्राम, इस्ताक अंसारी, म.ज.चाचेरे यांनी अथक परिश्रम घेतले.

Web Title: The lessons learned from making students an environment friendly song of Ganesh idol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.