गावात भोंगे लावून चिमुकल्यांना गिरवतो धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2020 05:00 AM2020-07-13T05:00:00+5:302020-07-13T05:01:19+5:30

देशाचे अतोनात आर्थिक नुकसान तर झाले आहेच सोबतच शिक्षणाचा ही बट्ट्याबोळ झाला आहे. त्यातल्या त्यात ऑनलाइन शिक्षण गावकऱ्यांना परवडणारे नाही. त्यामुळे खेडेगावातील मुले शिक्षणाअभावी भरकटल्या जाऊ नये, म्हणून फिजीकल डिस्टनसिंगचे पालनही व्हावे, यासाठी दावेझरी येथील जय मोरे नावाचा उच्चशिक्षित तरुण गावात पोंगे लावून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे गिरवीत आहे.

Lessons are given to the chimpanzees by blowing horns in the village | गावात भोंगे लावून चिमुकल्यांना गिरवतो धडे

गावात भोंगे लावून चिमुकल्यांना गिरवतो धडे

Next



दावेझरी येथील तरुणाचा उपक्रम : ऑनलाईन शिक्षणापेक्षा ऑफलाइन शिक्षण परवडणारे
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : सध्या संपूर्ण जगात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे संपूर्ण जगातील कामकाज ठप्प झाले आहे. देशाचे अतोनात आर्थिक नुकसान तर झाले आहेच सोबतच शिक्षणाचा ही बट्ट्याबोळ झाला आहे. त्यातल्या त्यात ऑनलाइन शिक्षण गावकऱ्यांना परवडणारे नाही. त्यामुळे खेडेगावातील मुले शिक्षणाअभावी भरकटल्या जाऊ नये, म्हणून फिजीकल डिस्टनसिंगचे पालनही व्हावे, यासाठी दावेझरी येथील जय मोरे नावाचा उच्चशिक्षित तरुण गावात पोंगे लावून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे गिरवीत आहे.
तुमसर तालुक्यातील दावेझरी हे ३०० लोकसंख्येचे गाव आहे. विकास काय असतो हे येथे पोहचलेच नाही. शिक्षणाचीही अशीच अवस्था. मात्र या गावातील जय मोरे नावाच्या ध्येयवेड्या तरुणाने सॉफ्टवेअर अभियांत्रिकीची पदवी घेतली. महानगरात मोठ्या पगाराची नोकरी मिळणे शक्य होते. परंतु त्याने गाव गाठले. गावातील शिक्षणाची अवस्था पाहून मन कळवळून आले. भावी पिढी शिक्षणापासून दूर जात असल्याचे लक्षात आले. या गावातील मुलांसाठी काही तरी करायची खुणगाठ बांधली आणि जिद्द चिकाटीच्या जोरावर एका रिकामाच्या जागेवर झोपडी तयार केली. सिमेंटच्या पोत्यांचे आच्छादन घालून त्यात गावातील विद्यार्थ्यांना शिकवणे सुरु केले. ज्ञानार्जनाचे कार्य सुरू असताना कोरोनाने जगभरात धुमाकूळ घातला. परिणामी लॉकडाऊन करण्यात आल्याने जिथल्या तिथे थांबल्या गेले. फिजीकल डिस्टनसिंग, जमाव बंदी आदींच्या अडचणी वाढल्या. परिणामी शिक्षणाचा बट्ट्याबोळ झाला. लहान मुले शिक्षणापासून दूर जात असल्याचे लक्षात येताच विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोळी निर्माण करण्याच्या बेताने गावात पोंगे लावून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे गिरवीत आहे.

जयच्या कार्याचे जगात झाले कौतूक
प्रत्येक मुलांना अँड्रॉइड मोबाईल घेऊन देऊ शकत नाही आणि तो तरुण ही प्रत्येकाच्या घरी जाऊ शकत नाही, अशा परिस्थिती मध्ये जयने स्वत: पैशाने डेकोरेशन घेतले. दोन पोंगे लावले आणि शिक्षण देणे सुरू केले. या त्याच्या कार्यात गावकरी सहकार्य करीत आहेत. जय हा विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची सर्व माहिती सोबतच राज्य शासन तसेच केंद्र सरकारच्या योजनांची माहिती देऊन गावकऱ्यांचे फार्म भरून ते तालुक्याच्या ठिकाणी नेऊन गावातील लोकांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून देत आहे. त्यामुळे गावकऱ्यांकरिता देवदूत ठरला आहे.जय मोरे यांच्या कार्याची दखल स्पेनच्या ‘ट्रान्सकॉन्टिनेंटल टाईम्स’ या आंतरराष्ट्रीय वृत्तसमूहाने घेतला आहे. जयने सॉफ्टवेअर अभियांत्रिकीचा पदवी अभ्यासक्रम नागपूर येथून घेतला आहे.

Web Title: Lessons are given to the chimpanzees by blowing horns in the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.