शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांची नगदी पिकांकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 00:24 IST

जिल्ह्यात धान पिकांचे पारंपरिक उत्पादन मोठ्या घेतले जाते. परंतू वाढत्या उत्पादन खर्चामुळे धान उत्पादक शेतकरी ऊस पिकासह कापूस, सोयाबीन यासारख्या नगदी पिकांकडे वळला आहे.

ठळक मुद्देवनविभागाकडून जनजागृतीचा अभाव : विविध कारणांमुळे पारंपरिक शेतीकडे कल वाढला

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात धान पिकांचे पारंपरिक उत्पादन मोठ्या घेतले जाते. परंतू वाढत्या उत्पादन खर्चामुळे धान उत्पादक शेतकरी ऊस पिकासह कापूस, सोयाबीन यासारख्या नगदी पिकांकडे वळला आहे. जिल्ह्यात वन्यप्राणी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत असल्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा नगदी पिकांकडे पाठ फिरवु लागला आहे. वारंवार वाढणाऱ्या वन्यप्राण्यांच्या घटनांमुळे शासनाकडून कोणतीच ठोस उपाययोजना होताना दिसत नाही. वनविभागाचे वारंवार उंबरठे झिजवूनही शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळत नाही. परिणामी अनेक शेतकरी पुन्हा एकदा पारंपारिक पध्दतीच्या धान पिकाकडे वळत आहे.भंडारा जिल्ह्यात धान उत्पादक शेतकऱ्यांनी नगदी पिकाकडे वळून आपला उत्कर्ष साधावा असा सल्ला प्रशासकीय अधिकारी, कृषी शास्त्रज्ञ कार्यक्रमादरम्यान देत असतात. परंतू वन्यप्राण्यांच्या वाढत्या समस्या,खताचे वाढते भाव यावर कोणत्याच उपाययोजना होत नसल्यामुळे शेतकºयांना नाईलाजास्तव पुन्हा एकदा पारंपारिक धान शेतीचा पर्याय निवडावा लागत आहे.जिल्ह्यातील साकोली, करडी, पवनी, देव्हाडा, मोहाडी येथे अनेक शेतकºयांनी नगदीपिकाचे चांगले उत्पन्न मिळवून देणारे ऊस पिक म्हणून मोठ्या प्रमाणात लागवड सुरु केली होती. परंतू कारखाण्याकडून शेतकऱ्यांची ऊस बिले सहा महिने लोटले तरी न मिळाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोडमडले. तसेच अन्य कोणत्याच सबसिडी स्वरुपात अनुदान नसल्याने शेतकरी ऊस,कपाशी पिकाची टाळाटाळ करीत आहे. तसेच खमारी, जवाहरनगर,मोहदुरा याठिकाणच्या शेतकऱ्यांनी कापुस पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली होती. अपेक्षीत नफाही मिळाला. परंतू कापसाच्या शेतात वाढत्या रानडुकरांच्या संख्येमुळे शेतकऱ्यांवर हल्ले होण्याच्या घटनां मध्ये वाढ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये भितीयुक्त वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना शेतशिवारात दहशतीच्या छायेखाली वावरावे लागत आहे. जिल्ह्यात २० हजार हेक्टर ऊसपिकाची लागवड केली गेली. जिल्ह्यात असणाऱ्या कारखान्याकडून शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे असतांना, प्रोत्साहन तर नाहीच पण शेतकऱ्यांची वेळेत बिले न काढल्यामुळेच शेतकऱ्यांचा नगदी पिकाकडचा कल कमी होत आहे. शेतकºयांचे जीवनमान उंचावण्यासाठी उपाययोजनेची गरज आहे.वन्यप्राण्यांचा वाढता अधिवास धोक्याचाकापूस, ऊस सोयाबीन यासारख्या पिकांमुळे वन्यप्राण्यांचा शेतातील वावर वाढतो. परिणामी हरिण, रानडुकर, निलगाय, माकडांचे कळप हिरवा चारा व पाण्यासाठी सुरक्षीत जागा यामुळे अशा पिकांकडे ंआपला मोर्चा वळवितात. तसेच रात्रीच्या वेळी अस्वल, ससे, रानडुकर तसेच त्यांच्या पाठोपाठ त्यांच्या शिकारीसाठी बिबट, लांडगे यांचाही वावर वाढतो. त्यामुळेच जिल्ह्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांवर व शेतमजुरांवर वन्यप्राण्यांच्या हल्ला झाल्याच्या घटना वाढल्या आहेत.तुटपुंजी मदतगेल्या दोन वर्षातील पावसाची सततची अनियमितता असल्यामुळ शेतकºयांच्या उत्पन्नात घट झाली आहे. तसेच भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कपासीसह मिरची, फळबागा, ऊस पिकांच्या लागवड क्षेत्रात घट झाली आहे. शासनाकडून हमीभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना दिवसेंदिवस वाढता उत्पादन खर्चामुळे शेती करणे कठिण होत आहे. शासनाकडून तुटपुंजी मदत दिली जाते.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती