भंडारा जिल्ह्यात सेवानिवृत्त अधिकाऱ्याच्या घरी सापडले बिबट्याचे कातडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 14:52 IST2019-07-08T14:48:55+5:302019-07-08T14:52:33+5:30
मोहाडी तालुक्यातील जांब (कांद्री) येथील सेवानिवृत्त राऊंड ऑफीसर देवेंद्र चकोले यांच्या घरी सापडले बिबट्याचे कातडे आढळून आल्याचे एकच खळबळ उडाली आहे.

भंडारा जिल्ह्यात सेवानिवृत्त अधिकाऱ्याच्या घरी सापडले बिबट्याचे कातडे
ठळक मुद्देडिएफओ विवेक होशिंग घटनास्थळी दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : मोहाडी तालुक्यातील जांब (कांद्री) येथील सेवानिवृत्त राऊंड ऑफीसर देवेंद्र चकोले यांच्या घरी सोमवारी सकाळी बिबट्याचे कातडे आढळून आल्याचे एकच खळबळ उडाली आहे. सेवानिवृत्तीनंतर त्यांच्या घरातील सामान अन्यत्र हलविताना प्रकार उघडकिला आल्याची प्राथमिक माहिती आहे. आठ दिवसांपूर्वीच चकोले सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या घरी कातडे कुठून आले व ते घरी ठेवण्याचे काय कारण, याचा तपास सुरू झाला असून डीएफओ विवेक होशिंग घटनास्थळी दाखल झाले आहेत.