बिबट्याने केली शेळी फस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:24 IST2021-07-11T04:24:22+5:302021-07-11T04:24:22+5:30
लाखांदूर : घरालगत असलेल्या गोठ्यात बांधलेल्या शेळ्यांवर मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने हल्ला करून शेळी फस्त केल्याची घटना उघडकीस आली आहे. ...

बिबट्याने केली शेळी फस्त
लाखांदूर : घरालगत असलेल्या गोठ्यात बांधलेल्या शेळ्यांवर मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने हल्ला करून शेळी फस्त केल्याची घटना उघडकीस आली आहे. सदर घटना तालुक्यातील मडेघाट येथे १० जुलै रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली असून, मनोज चरणदास जांभूळकर असे पीडित पशुपालकाचे नाव आहे. पीडित पशुपालक शेतकरी असून, शेतीला जोड व्यवसाय म्हणून गत काही वर्षांपासून पशुपालनाचा व्यवसाय करीत आहेत. पशुपालनअंतर्गत शेळ्यांचे पालन केले जाते. संबंधित पशुपालकांकडे जवळपास ८ शेळ्या असून, दिवसा शेळ्यांना चारा आणून संध्याकाळच्या सुमारास घरालगत असलेल्या गोठ्यात बांधले जाते. पशुपालकाने शेळ्या चारून आणून रात्रीच्या सुमारास घरालगत असलेल्या गोठ्यात बांधून ठेवल्या. मात्र, रात्रीच्या सुमारास बिबट्याने हल्ला करून शेळी फस्त केली. सदर दुर्घटनेत पीडित पशुमालकाचे जवळपास १० हजार रुपयांचे नुकसान झाले. नुकसान भरपाई मिळण्याची मागणी गावकऱ्यांत केली जात आहे. घटनेची माहिती वनविभागाला होताच, येथील वनपरिक्षेत्राधिकारी रूपेश गावीत यांच्या मार्गदर्शनात येथील वनरक्षक एम.ए. भजे घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला.