बिबट्याने केली चितळाची शिकार
By Admin | Updated: April 17, 2016 00:22 IST2016-04-17T00:22:17+5:302016-04-17T00:22:17+5:30
तालुक्यातील चारभट्टी परिसरातील जंगलात एका बिबट्याने पहाटेच्या सुमारास चितळाची शिकार करुन चितळाचे अवयव खावून रस्त्यावर आणून ठेवले.

बिबट्याने केली चितळाची शिकार
लाखांदूर : तालुक्यातील चारभट्टी परिसरातील जंगलात एका बिबट्याने पहाटेच्या सुमारास चितळाची शिकार करुन चितळाचे अवयव खावून रस्त्यावर आणून ठेवले. वनकर्मचाऱ्यांनी घटनेचा पंचनामा करून चितळाला जमिनीत पुरले.
लाखांदूर तालुक्यातील जंगलात बिबट्याची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मागील काही दिवसात दिघोरी परीसरात बिबट मृतावस्थेत आढळून आला होता. मागीलवर्षीही दांडेगाव जंगलात एक बिबट मृतावस्थेत आढळून आला होता.
शनिवारला चारभट्टी परिसरातील जागृत हनुमान मंदिर परीसरात भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते. सकाळी भलामोठा चितळ अर्धवट खालेल्या अवस्थेत आढळून आला.
हा परिसर लाखांदूर व अजुर्नी (मोरगाव) सीमेवर असून एफडीसीएमच्या अखत्यारीत येत असून याची माहिती अधिकाऱ्यांना देण्यात आली. कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून शवविच्छेदन न करता चितळाला जमिनीत पुरण्याच्या हालचाली वन कर्मचाऱ्यांनी सुरू केल्या होत्या.
मात्र बिबट्याची शिकार त्याला खाऊ द्या अन्यथा भुकेला बिबट पुन्हा दुसऱ्या प्राण्याची शिकार करेल यासाठी ग्रामस्थ व वनकर्मचाऱ्यांनी रात्रभर पाळत ठेवली होती. परंतु बिबट मात्र आला नाही. (तालुका प्रतिनिधी)