शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

राजनी गावात बिबट्याचा थरार, एक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2019 15:23 IST

 लाखांदूर तालुक्याच्या राजनी येथे रविवारी सकाळी ६ वाजता बिबट्याने गावात प्रवेश करून एकास गंभीर जखमी केले.

भंडारा:  लाखांदूर तालुक्याच्या राजनी येथे रविवारी सकाळी ६ वाजता बिबट्याने गावात प्रवेश करून एकास गंभीर जखमी केले. तर एका घरात शिरून तब्बल सात तास ठिय्या मांडला होता. यामुळे संपूर्ण गावभर दहशत पसरली होती. बिबट्याला पाहण्यास प्रचंड गर्दी झाली होती. वनविभागाने सात तासांनंतर बिबट्यास बंदिस्त केले. लाखांदूरवरून १५ कि.मी.अंतरावर असलेल्या राजनी या गावात रविवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास शेतशिवारातून आलेल्या बिबट्याने प्रवेश केला आणि गुरूदेव निंबेकर यांच्यावर हल्ला केला. बिबट्याने केलेल्या हल्ल्यात गुरूदेव नालीत पडला. त्यानंतर बिबट्याने केवळराम गोविंदा प्रधान यांच्या घरासमोर गोठ्यात गुरे बांधली दिसल्याने बिबट्यानं त्या दिशेने धाव घेतली. गुरांच्या गोठ्याला लागूनच केवळराम प्रधान यांची स्वयंपाक खोली असून त्यात केवळराम प्रधान यांची सून पौर्णिमा प्रधान स्वयंपाक करत होती. 'बिबट आला बिबट आला' म्हणत लोकांनी आरडा-ओरड केली असता, पौर्णिमा देखील स्वयंपाक खोलीतून बाहेर पडली आणि बिबट्याने स्वयंपाक खोलीत प्रवेश घेतला. बिबट्याला पाहण्यास संपूर्ण गाव एकवटल्यानंतर गावातील गोपाल तरेकार नामक व्यक्तीने समयसुचकता बाळगत बिबट आत घुसलेल्या स्वयंपाक खोलीचे दार बाहेरून लावून घेतले व लाखांदूरचे वनपरिक्षेत्राधिकारी रमेश दोनोडे यांना माहिती दिली. त्यानंतर वनविभाग लाखांदूरचं चमू राजनी गावात दाखल झालं सोबतच पोलीस बंदोबस्तात लोकांची गर्दी कमी करत संपूर्ण घराला जाळे लावत बिबट्याला बंदिस्त करण्यासाठी भंडारा येथून पिंजरा आणल्या गेला. मात्र बिबट्याला पिंजऱ्यात बंदिस्त करता आले नसल्याने ट्रँग्युलायझेशन पथकाकडून बंदुकीद्वारे बिबट्याला बेशुद्ध करून बंदिस्त करण्यात आले. बंदिस्त करेपर्यंत बिबट पाहण्यासाठी तालुक्यातील असंख्य लोकांनी गर्दी केली असल्याने लोकांना शांत करताना पोलीस बंदोबस्त तोकडा असल्याने पोलीस प्रशासन व वनविभागाला दमछाक करावी लागली. दरम्यान सलग सात तासांनंतर स्वयंपाक खोलीत ठिय्या मांडून बसलेल्या बिबट्याला बंदिस्त करण्यात आले. बिबट्याला बंदिस्त करताना वनपरिक्षेञाधिकारी रमेश दोनोडे, सहाय्यक वन संरक्षक पवार साहेब साकोली, वनपाल कु.बि.एच.गजापुरे (रोकडे), बि.एच.मंजलवार, एस.जी.जाधव, व्हि.बी.पंचभाई, ए.जे.वासनिक, जे.के.दिघोरे, पोलीस नायक तलमले, कठाने, वैरागडे, लखन उईके यांचा समावेश होता. बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेले गुरूदेव निंबेकर यांना उपचारासाठी सामान्य रुग्णालय लाखांदूर येथे दाखल करण्यात आले असून, त्यांच्या हाताला जखम झाली आहे.

टॅग्स :leopardबिबट्या