विहिरीत पडून बिबट्याचा मृत्यू

By Admin | Updated: October 27, 2014 22:31 IST2014-10-27T22:31:11+5:302014-10-27T22:31:11+5:30

पारडी येथील शेतकरी पुरुषोत्तम भेंडारकर यांचे शेतातील विहिरीत बेडूक खाण्याच्या बेतात बिबट्या विहीर पडला. यात त्याचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी उघडकीस आली.

Leopard death by well in well | विहिरीत पडून बिबट्याचा मृत्यू

विहिरीत पडून बिबट्याचा मृत्यू

लाखांदूर : पारडी येथील शेतकरी पुरुषोत्तम भेंडारकर यांचे शेतातील विहिरीत बेडूक खाण्याच्या बेतात बिबट्या विहीर पडला. यात त्याचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी उघडकीस आली.
लाखांदूर तालुक्यात अनेक गावे जंगलाला लागून वसलेली आहेत. दिघोरी सहवन क्षेत्रांतर्गत पारडी हे गाव जंगलाला लागून आहे. गावातील नागरिकांची शेती जंगलालगत असल्याने अनेक हिंस्त्र पशू गावात व शेताकडे धाव घेतात. असाच एक बिबट पारडी गावालगतच्या शेतात शिकारीसाठी आलेला असता पुरुषोत्तम भेंडारकर यांच्या शेतात पाणी प्याला व तोंडी नसलेल्या विहिरीत बेडूक दिसल्याने विहीरीत उडी घेतली. बाहेर येता न आल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना दोन दिवसापूर्वीच घडली असून आज पुरुषोत्तम जेव्हा शेतात गेला त्याला विहिरीजवळ दुर्गंधी आली. विहिरीत डोकावून बघितले असला सडलेल्या अवस्थेत बिबट पाण्यावर तरंगताना दिसला. याची माहिती त्यांनी वनविभागाचे अधिकाऱ्यांना दिली. यापूर्वी दांडेगाव कंपार्टमेंटमध्ये असाच एक बिबट मृतावस्थेत आढळून आला होता. दुसऱ्यांदा बिबट मृतावस्थेत आढळून आल्याने या जंगलव्याप्त परिसरात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याचे वनपरिक्षेत्राधिकारी तडस यांनी सांगितले. सदर मृत बिबट अडीच वर्षाचा असून नर होता. पशु वैद्यकीय अधिकारी डॉ.लांजेवार यांनी शवविच्छेदन केले. तर सहाय्यक वनसंरक्षक पटले, क्षेत्र सहायक डफरे, जांगळे यांनी मृत बिबट्याला जाळून तपास हाती घेतला. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Leopard death by well in well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.