शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पाच महिन्यांपासून लेडेझरी पिण्याच्या पाण्यापासून वंचित

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2024 11:56 IST

ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : तीन किमी अंतराहून महिलांना आणावे लागते पाणी

लोकमत न्यूज नेटवर्क करडी / पालोरा : केसलवाडा गट ग्रामपंचायतींतर्गत येत असलेल्या ३० लोकसंख्येचे असलेले लेंडेझरी गावामध्ये ग्रामपंचायतकडून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून दिलेली नाही. येथील नागरिकांना पाच महिन्यांपासून पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे.

लेंडेझरी गाव केसलवाडा गट ग्रामपंचायतीला जोडला असल्यामुळे सरपंच यांनी चार वर्षे लोटूनही आजपर्यंत लेंडेझरी गावाला भेट दिली नाही. अथवा गावातील समस्यांकडे लक्ष दिले नाही. उन्हाळ्यापासून लेंडेझरी येथील नागरिकांना तीन कि.मी. अंतरावरून पाणी आणावे लागत आहे. ग्रामपंचायतीला पाण्याच्या व दिवाबत्ती बाबतीत पत्रव्यवहार केला. आजपर्यंत नागरिकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून देण्यात आलेली नाही.

दूषित पाणी पिण्याची वेळशुद्ध पाणी मिळत नसल्यामुळे नागरिकांना दूषित पाणी पिण्याची वेळ आली आहे. समस्या गंभीर असताना स्थानिक प्रशासन लक्ष द्यायला तयार नाही.

प्रशासन काळजी घेणार?ग्रामपंचायतीमार्फत दीड हजार रुपये पाण्याचे देत असून, पाण्याचा प्रश्न उद्भवत नाही. प्रशासन काळजी घेत असल्याचे ग्रामसेवकांचे म्हणणे आहे.

याकडेही लक्ष द्या नागरिकांना पाण्याची सोय व गावातील दिवाबत्तीची सोय करण्यात यावी, अशी मागणी फुलचंद मडावी, विनोद सोनवाने, विश्वास मडावी, कुंडलिक मेश्राम, रणजित उके, मटू नारनवरे, सुनील नेवारे, गंगाबाई वायरे, सुनीता मेश्राम, पर्मिला सोनवणे, शीलाबाई मडावी यांनी केली आहे.

ग्रामपंचायतींतर्गत आहे आरोग्रामपंचायतींतर्गत आरो असून, सहा महिन्यांपासून बंद पडलेला आहे. बाहेर पाणी वापरण्यासाठी मिळत आहे, परंतु ते पाणी पिण्याचा उपयोगी नाही. उपसरपंच राजेंद्र शेंद्रे यांनी प्रत्येक मासिक सभेत पाण्यासंबंधी विषय मांडत असून, सरपंच व ग्रामसेवकाकडून दुर्लक्ष केले जात आहे. आरो प्लान्ट दुरुस्ती करण्यात आले नाहीत. त्यामुळे दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

खासगी बोअरवेचा पाणी उपलब्ध करून दिले"केसलवाडा व लेंडेझरी पं. गट ग्रामपंचायत असल्यामुळे लेंडेझरी गावात ९ कुटुंब राहत असून, पाण्याचा आरो लावण्यात आले आहे. परंतु आरो प्लॅन्ट बिघडले असल्यामुळे एका खासगी बोअरवेचा पाणी उपलब्ध करून देण्यात आले."- पंकज काटेखाये, ग्रामसेवक, केसलवाडा 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईwater pollutionजल प्रदूषणbhandara-acभंडारा