सावकाराची शेतकऱ्याला मारहाण

By Admin | Updated: March 30, 2015 00:26 IST2015-03-30T00:26:18+5:302015-03-30T00:26:18+5:30

सावकाराकडे व्याजासहित रक्कम परत केल्यावरही सावकार व त्याच्या तीन सहकाऱ्यांनी कर्जदाराच्या भावाला बेदम मारहाण केली.

The lenders beat the farmer | सावकाराची शेतकऱ्याला मारहाण

सावकाराची शेतकऱ्याला मारहाण

तुमसर : सावकाराकडे व्याजासहित रक्कम परत केल्यावरही सावकार व त्याच्या तीन सहकाऱ्यांनी कर्जदाराच्या भावाला बेदम मारहाण केली. यात कर्जदाराचा भाऊ गणेश बिसने (२५) रा. गर्रा बघेडा हे गंभीर जखमी झाले. गोबरवाही पोलिसांनी अभयपक्षी (अदखलपात्र) गुन्हा दाखल केला. आदर्श सांसद गाव येथे ही घटना घडली.
जखमी गणेश बिसने यांचा मोठाभाऊ निलेशने गावातील अवैध सावकार राजेश ठाकुर याचेकडून एका वर्षापूर्वी ५ टक्के दराने ७० हजार रुपये कर्ज घेतले होते. निलेश यानी व्याजासहीत संपूर्ण कर्ज परत केले होते. याचा पुरावा सावकाराकडून मिळालेल्या कागदावर आहे. या कागदावर सरपंच वसंत तरटे यांची स्वाक्षरी शेऱ्यासह आहे. कर्ज व्याजासहित परत केल्यावरही राजेश ठाकुर तथा त्याच्या कुटुंबीयाने कर्ज घेणारे निलेश यांचे लहानभाऊ गणेश यांना नेहमी मानसिक त्रास देत होते. रस्त्यात मार्ग रोखून कर्जाची रक्कम परत करा असी मागणी केली जात होती. गुरुवारी गणेशने याप्रकरणात मागणी करुन मानसिक त्रासाबद्दल विचारणा केली होती. तेव्हा राजेश ठाकुर (३३), राधेश्याम ठाकुर (४०), घनश्याम ठाकुर (३५) यांनी गणेशला बेदम मारहाण केली. यात गणेश गंभीर जखमी झाला.
गोबरवाहीचे ठाणेदार अड्याळकर यांनी उभयपक्षी गुन्हा नोंदविल्याचे समजते. यामुळे पोलीस प्रशासनच अवैध सावकारीला येथे प्रोत्साहन देत असल्याचे दिसून येते. गर्रा बघेडा हे गाव तेव्हा चर्चेत आले जेव्हा खा. नाना पटोले यांनी सांसद दत्तक ग्राम म्हणून गर्रा बघेडा या गावाची निवड केली.
गाव आदर्श म्हणून जरी येथे निवड झाली असली तरी त्याची प्रत्यक्ष सुरुवात येथे झाली नाही असे दिसून येते. अवैध सावकारी हे प्रकरण अतिशय गंभीर आहे. पोलिस प्रशासन येथे अदखल गुन्हा नोंदविते म्हणजेच येथे अवैध सावकारीला निश्चितच पोलिसांचे अभय आहे.
खासदार दत्तक गाव म्हणून निवड झाल्यानंतर या गावात अधिकाऱ्यांच्या, लोकप्रतिनिधीच्या आतापर्यंत अनेक बैठका झाल्या शासनाला तसा अहवाल आठ ते पंधरा दिवसात पाठविण्यात येत आहे. पालक सचिव म्हणून येथे खंडविकास अधिकाऱ्यांची निवड केली आहे. अवैध सावकारीची माहिती या अधिकाऱ्यांना नसावी काय? हा संसोधनाचा विषय आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The lenders beat the farmer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.