युवक-युवतींना कायदेविषयक मार्गदर्शन
By Admin | Updated: September 2, 2015 00:30 IST2015-09-02T00:30:38+5:302015-09-02T00:30:38+5:30
पोलीस स्टेशन कारधा व पांडव अभियांत्रिकी कॉलेज भिलेवाडा यांच्या संयुक्त विद्यमाने पांडव अभियांत्रिकी कॉलेज भिलेवाडा येथे युवांना कायदेविषयक जाणिव जागृती व्हावी...

युवक-युवतींना कायदेविषयक मार्गदर्शन
उपक्रम : कायद्याच्या जागृतीबाबत दिली माहिती
भंडारा : पोलीस स्टेशन कारधा व पांडव अभियांत्रिकी कॉलेज भिलेवाडा यांच्या संयुक्त विद्यमाने पांडव अभियांत्रिकी कॉलेज भिलेवाडा येथे युवांना कायदेविषयक जाणिव जागृती व्हावी याकरिता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप झळके हे होते. तसेच अपर पोलीस अधिक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, मारोती शेंडे, प्राचार्य संजय मोवाळे, सहा. पोलीस निरीक्षक रहांगडाले, समुपदेशक मृणाल मुनेश्वर उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी मार्गदर्शन करतांना दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यात वाढ झालेली आहे. त्याबाबत समाजात जागृकता आली पाहिजे. वाढत्या गुन्हेगारीला आळा बसावा म्हणून कायदेविषयक जनजागृती निर्माण व्हावी याकरिता पांडव कॉलेज पासुन कार्यक्रमास सुरुवात झाली आहे. महाविद्यालयीन शिक्षण म्हणजे अॅटॉमिक एनर्ज या वयात राहते. माणसाला प्रगती साधायची असेल तर दुसऱ्याशी कधीही तुलना करु नये स्वत:वर विश्वास असायला पाहिजे जिवनात निरंतरता, प्रामाणिकपणा, आणि दिशा यांची तोड परिश्रमाला मिळाली तर माणूस जिवनात निश्चीतच यशस्वी होतो.
अपर पोलीस अधिक्षक बारवकर म्हणाल्या, युवा पिढी ही देशाचा आधारस्तंभ आहे. त्यांनी सायबर क्राईम, रोडवरील अपघात, कौटुंबिक हिंसाचार, देह व्यापार, मुला-मुलींची अनैतिक वाहतुक, महिलावरील अत्याचारा संदर्भातील गुन्हे हे आजच्या युवा कडून कळत- नकळत कसे घडतात आणि त्याला बळी कसे पडतात हे विविध उदाहरणाद्वारे समजावून सांगितले. हे घडू नये म्हणून युवामध्ये जाणीव जागृती निर्माण व्हायला पाहिजे याकरिता हा कार्यक्रम आयोजित केला आहे. पोलीस हा तुमचा मित्र आहे.
तुम्हाला ड्रग्ज, गांजा, ब्राउनशुगर इ. अमलीपदार्थ आढळल्यास त्याची माहिती तात्काळ पोलिसांना दया. कोणत्याही अनोळखी व्यक्तीची पुर्णपणे ओळख पटल्याशिवाय त्याच्याशी कुठल्याही प्रकारचा व्यवहार करु नका. अनोळखी नंबर वरुन फोन आल्यास, तुमच्या बँकेच्या अकाउंट नंबर, एटीएम कार्ड नंबर, पिन नंबरबद्दल विचारणा केल्यास त्याला माहिती देऊ नका असे सांगितले. यावेळी मृणाल मुनेश्वर युवा व महिला मार्गदर्शन व सल्ला केंद्र भंडारा यांनी युवा पिढी व व्यसानाधिनतेच्या आहारी कशी गेली आणि समाजात कसे अनिष्ठ प्रकार घडतात.
प्रेमाच्या आहारी जावून आणि अश्या प्रकारात न पडता स्वत:च्या पायावर उभे राहून स्वत:चे जीवन उज्वल करायला पाहिजे असे उदाहरणाद्वारे सागितले. संचालन परीहार डहाके यांनी केले कार्यक्रमाला उपस्थित पांडव कॉलेज मधील सर्व प्रशिक्षणार्थी, प्राध्यापक वर्ग तसेच प्राध्यापिका, महिलासेलचे कर्मचारी, सुरक्षा समिती सदस्या उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)