कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर

By Admin | Updated: February 9, 2016 00:33 IST2016-02-09T00:33:49+5:302016-02-09T00:33:49+5:30

तालुका विधी सेवा समिती मोहाडी तर्फे मांडेसर येथे मोबाईल व्हॅन कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन ५ फेब्रुवारीला करण्यात आले होते.

Legal Guidance Camp | कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर

कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर

मोहाडी : तालुका विधी सेवा समिती मोहाडी तर्फे मांडेसर येथे मोबाईल व्हॅन कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन ५ फेब्रुवारीला करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मोहाडी तालुका विधी सेवा समिती अध्यख तथा दिवाणी न्यायाधिश आर. व्ही. डफरे ह्या होत्या. प्रमुख अतिथी म्हणून सरपंचा मंगला नागपुरे, तंमुस अध्यक्ष दुर्योधन अटराये, उपसरपंच सुधाकर मालाधारी, पोलीस पाटील महेश सव्वालाखे, दिलीप सव्वालाखे उपस्थित होते.
याप्रसंगी अ‍ॅड. बी.बी. सेलुकर, डी. एस. मेश्राम यांनी कायदेविषयक मार्गदर्शन केले. आईवडिलांना घराबाहेर काढने हा गुन्हा असून संबंधितांवर कारवाई होवु शकते, पाच हजार दंड व तीन वर्षांच्या कारावासाची तरतूद आहे. आई वडिलांना मुलाकडून पोटगी माण्याचा अधिकार आहे. पत्नी पतीपासून वेगळी राहत असल्यास वार्षिक उत्पन्नाच्या आधारे पोटगी मागण्याचा अधिकार असल्याचे सांगण्यात आले. संचालन अ‍ॅड. डी. एस. मेश्राम यांनी केले. आभार डी. जी. तांबडे यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Legal Guidance Camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.